गीतकार : वसंत शिंदे, सातारा
स्वर : बबनदादा चखाले
आर्त गाणे सांजवेळी
कोण गाते सांजवेळी
लाल झाली पश्चिमा अन्
ऊन पिवळे सांजवेळी
रे कुणाच्या आठवाने
नभ थरारे सांजवेळी
लांघुनी आकाश कोठे
खग निघाले सांजवेळी
वासरांच्या सोबतीने
धूळ उडते सांजवेळी
शाल पांघरता फुलांनी
दव पसरले सांजवेळी
- वसंत शिंदे , सातारा.
कोण गाते सांजवेळी
लाल झाली पश्चिमा अन्
ऊन पिवळे सांजवेळी
रे कुणाच्या आठवाने
नभ थरारे सांजवेळी
लांघुनी आकाश कोठे
खग निघाले सांजवेळी
वासरांच्या सोबतीने
धूळ उडते सांजवेळी
शाल पांघरता फुलांनी
दव पसरले सांजवेळी
- वसंत शिंदे , सातारा.
0 टिप्पण्या