आयुष्य हे पुन्हा...
वृत्त - आनंदकंदलगावली - गागालगा लगागा गागालगा लगागा
आयुष्य हे पुन्हा मी मांडून घेत आहे
हाती जसे मिळाले दुसऱ्यास देत आहे.
तो एकटाच नव्हता वसुदेव पार गेला
मी जिंदगी किनारी दररोज नेत आहे.
सुटली कधी मुठीतुन कळले कुणास नाही
पाण्याहुनी तरल ही आयुष्य रेत आहे.
जागा विकून त्याने घर बांधले नव्याने
कळले कसे न त्याला गर्भार शेत आहे.
मज जायचेच नव्हते सोडून या घराला
मजला कुणी तरी का नेण्यास येत आहे.
ना भेटली मला ती याचे न दुःख सलते
तो हृद्य भास माझ्या अजुनी कवेत आहे.
गझलकार : वसंत शिंदे, सातारा.
0 टिप्पण्या