Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

रेडमी | रहस्यमय कथा | सौ हेमा येणेगूरे

रेडमीची कथा

रेडमी | Redmi in Marathi

गोव्यातील आजची सकाळ जरा गोंधळाचीच उगवणार होती. सगळे कामात गुंग होते. लवकर आवरून कामावर जाण्यासाठी गडबड चालू होती आणि सगळीकडे बातमी पसरली रेडमी डिसुझा गायब. रात्रीपासून‌ कुठेचं दिसत नाही. तिला शेवटचं तिची मेड अॅनीने आठ वाजता बाहेर गार्डनमध्ये फोनवर बोलत फिरताना पाहिले होते. बराच वेळ गेल्यावर ती रेडमीला बोलवायला म्हणून बाहेर गेलीतर रेडमी नव्हती. अॅनी बाहेर खूप वेळ तिची वाट पहात बसली होती. ती फोनवर बोलत बोलत कुठेतरी निघून गेली असेल. गडबडीत सांगायचं विसरली असेल असं वाटलं पण रात्रीचे बारा वाजले तरी रेडमी परत आली नाही. तेंव्हा मात्र तिला तिची काळजी वाटू लागली. तिने लगेच तिच्या मॅनेजरला बोलावून घेतलं आणि सर्व परिस्थिती सांगितली. खरंतर तो चिडलाच होता. झोपेतून उठवलं म्हणून. कारण रेडमी रात्री अपरात्री कधीही त्याला बोलवत असे. आजही तसेच घडलं असेल असं वाटलं पण इथे वेगळंच काहीतरी घडलं होतं. तो पोलिसांनकडेही जाऊन आला. पण बारा तासानंतर जर ती आली नाही तर ते शोधणार होते. रेडमी ही साधीसुधी व्यक्ती नसून भारतातील टॉपची माॅडेल होती. मुळची रशियन पण राॅकी डिझुजा बरोबर लग्न करून ती गोव्यात आली होती. वय वर्षे सत्तावीस. राॅकीचे वय पत्तीस. सात-आठ वर्षे मोठ्या नवऱ्यात तिनं काय पाहिलं माहित नाही. पण एका कॅमेरामनच्या प्रेमात पडून इथंवर आली होती. राॅकीची तर लाॅटरीच लागली होती. पण आज राॅकी होता कुठे? तो ऐमीली सोबत वा नेगीसोबत होता. या त्याच्या मैत्रिणी राॅकीच्या जिवावर मजा मारणाऱ्या. वेळोवेळी त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या बिघडलेल्या मुली. रेडमीला सगळं माहीत असूनही राॅकीवर जिवापाड प्रेम करायची. तिच्या पैशावर मजा करणारा नवरा असूनही ती गप्प बसायची. टाॅपची माॅडेल पण प्रेमात हतबल ठरलेली. कधी कधी रात्रभर रडून काढत असे. पण आज ती सापडत नव्हती. कुठे गेली होती की ती आत्महत्या करायला गेली की कोणी तिचं कीडनॅप केलं. काही कळायला मार्ग नव्हता. तिच्या घरासमोर चॅनल वाल्यांची गर्दी होऊ लागली. टिव्हीवर तिची बातमी फिरू लागली. ऐमीलीन राॅकीला गदागदा हलवून झोपेतून जागं केलं आणि टिव्ही वरची बातमी दाखवली. तो घाईगडबडीत कपडे घालून घराकडे निघाला.

राॅकी घरात मागच्या दरवाजाने आत आला. थोडंसं फ्रेश होऊन. रडका चेहरा करून तो मिडिया समोर गेला. तो त्यांच्यासमोर आल्या बरोबर सगळ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. खरंतर राॅकीला काय घडलं आहे हे काही माहिती नव्हतं. पण तो सराईतपणे खोटं बोलू लागला.

काल आम्ही रेडमीची जेवणासाठी वाट पाहत डायनिंग टेबलवर बसलो होतो. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. रेंज मिळेना म्हणून ती बाहेर गेली. तेथेच फोनवर बोलत होती पण बराच वेळ वाट पाहून ती येत नाही असे वाटले तेव्हा अॅनीला बोलवायला बाहेर पाठवले. पण रेडमी बाहेर नव्हती. ती बऱ्याचदा फोनवर बोलत बोलत बाहेर निघून जात असे. आम्हालाही तसेच वाटले पण ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही.

पण तुम्ही तर रात्री घरी नव्हतात. राॅकी सर? पोलीस आले तेव्हा त्यांना तुम्ही दिसला नाहीत.

अं, राॅकी गांगरला, पण लगेच सावरला. कसा दिसेन मी, रेडमीला शोधायला बाहेर पडलो होतो. पहाटे चार वाजेपर्यंत मी सर्व रस्ते शोधले. शेवटी थकून घरी येऊन झोपलो. पण झोप कसली येतेय. तिच्या चिंतेने झोपच उडाली आहे.

खरंच राॅकीची झोप उडाली होती. रेडमी जर लवकर नाही मिळाली तर त्याचे खायचे प्यायचे वांदे होणार होते. रेडमीला तो‌ कधी इमोशनल तर कधी ब्लॅकमेल करून पैसे काढत होता. याच पद्धतीने त्याने तिला आपल्याशी लग्न करण्यास भाग पाडले होते. सुरवातीला नाइलाजाने का होईना तिने हे लग्न केले होते. पण नंतर ती नवरा म्हणून राॅकीवर जिवापाड प्रेम केलं होतं. एखाद्या सुंदर अप्सरेसारखी रेडमी, नाके डोळे नीटसं, निळे डोळे, गुलाबी ओठ, कोरीव शिल्प असल्यासारखी ती होती. भले भले श्रीमंत लोक तिच्याशी लग्न करण्यासाठी धडपडत होते. पण रेडमीने राॅकीशी लग्न करून सगळ्या श्रीमंत लोकांमध्ये गोंधळ उडवला. सिनेमाच्या मायावी दुनियेतही तिने खळबळ माजवली. रशियाची टाॅपची माॅडेल, लाखो रुपये कमावून देशाला देणारी, ती भारतात आली. रशियन सरकार तिच्या या निर्णयावर नाराज झाले. पण भारतात रेडमीमुळे भरपूर पैसे येऊ लागले. रेडमी गोव्यात रहायला आली आणि गोव्यातील वातावरणच बदललं.

रेडमी शॉ, रिचर्ड शाॅचे दुसरे अपत्य. रेडमीची आईमुळं अमेरिकन पण रिचर्ड बरोबर लग्न करून रशियात आलेली. रेडमीची आई रुबेल एक सुंदर माॅडेल होती. परीसारखी सुंदर, रेडमी तर आईच आणि आपलं रुप घेऊन अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली होती. वयाच्या चौथ्या वर्षी ती शाळेत एक प्ले करत असताना एका अॅडव्हरटाईज डायरेक्टरची नजर रेडमीवर पडली. त्याने तिला अॅडमध्ये घेतलं. पण रेडमीची एक प्रोटीनची अॅड इतकी गाजली की ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. वयाच्या पाचव्या वर्षी ती एक नामांकित आणि महागडी माॅडेल म्हणून ओळखली जाऊ लागली. अमाफ पैसा मिळू लागला. तिच्या वडिलांनी आपला कामधंदा सोडून तिच्या पैशावर मजा मारू लागला. अति दारू पिणे, पार्ट्या करणे असे अनेक गोष्टीत तो पैसे उडवू लागला. एकदा तर आपले कर्ज चुकवण्यासाठी रेडमीचं अपहरण केलं आणि ‌तळघरात डांबून ठेवले. पाच वर्षाची पोर घाबरून व उपाशी राहून बेशुद्ध पडली. पोलीस सगळीकडे शोधत होते पण ती सापडत नव्हती. पोलीस पैसे देऊ देत नव्हते. एक करोड ही किंमत कमी नव्हती. त्यानंतरही ती नाही मिळाली तर? पण प्रकरण वाढत आहे पाहून रात्रीतून त्याने रेडमीला तळघरातून बाहेर काढून गेट समोर टाकलं. सकाळी अॅनीला दिसली. पूर्ण दिवसभर तिच्यावर उपचार चालू होते. ती शुद्धीवर आल्यावर तिने वडिलांनी जे केले ते तिने तिच्या आईला सांगितले. रेडमीच्या जीवाला धोका आहे. हे जाणून रूबेलने मग रेडमीचे अकांऊट आपल्या नावावर बदलून घेतले. रिचर्ड खूप चिडला रूबेलला मारलं आणि नशेतच घराबाहेर पडला. कारची स्पीड जास्त असल्याने त्याचे गाडीवर नियंत्रण राहिले नाही आणि ती समोरच्या खांबावर जाऊन आदळली. रिचर्डला जबरदस्त मार लागला. पंधरा दिवस दवाखान्यात तो मृत्यू शी झुंजला आणि मरण पावला. रेडमी आणि राॅजर बापाला पोरके झाले. बापाविना जगावे लागत होते. आई रूबेल हिंमतीने सगळं सांभाळत होती. आपल्या मुलीला दुसरा कोणी बाप प्रेम करणारा मिळणार नाही, असे वाटल्याने तिने दुसरे लग्न ही केले नाही.

रूबेल जरी एकटीने सर्व सांभाळत असली तरी तिला जीवनात खूप एकटं एकटं वाटायचं. ती कित्येक वेळा एकटीच चर्चमध्ये जाऊन बसायची. कधी कधी रडायची. आपला त्रास फादरला सांगायची. वयाने केवळ तीस वर्षाची पण सगळं तिच्या अंगावर पडलं. ती सगळं करून थकून जायची. लहान वयात खूप भोगलं बिचारीन. ती एकदा अशीच चर्चमध्ये बसली असताना जेम्स पार्कर नावाचा एक व्यक्ती तेथे येऊन बसला. तोही थोडासा दु:खी वाटत होता. तोंडाने अतिशय शांत व सोज्वळ दिसत होता. रूबेलला रडताना पाहून तो तिच्या जवळ आला. तिला काही होतंय का असं विचारू लागला. ती नाही म्हणाली आणि चर्च मधून बाहेर पडून एका झाडाखाली येऊन बसली.

हाय, मी जेम्स पार्कर, मी मुळचा अमेरिकेचा पण कामा निमित्त येथे आलोय. तुम्हाला पाहून तुम्ही अमेरिकन वाटताय. तुम्हाला काही त्रास किंवा दु:ख आहे का? मी ते कमी करू शकणार नाही. पण मला सांगितलं तर तुम्हाला हलकं वाटेल. खरं तर रुबेलला तो अमेरिकन आहे हे ऐकल्यावर ती आनंदी झाली होती. ती कान टवकारून सगळं ऐकत होती. ती स्मित हास्य करून म्हणाली, डोळे काय कधीही गळतात. त्याला कामच काय? तुम्ही अमेरिकेत कुठे असता? तुम्ही बरोबर ओळखलंत मी अमेरिकन आहे. माझे पती रशियन होते. आता ते या जगात नाही. अशी जुजबी ओळख होऊन ते दोघे आपापल्या घरी निघून आले. पण ते आता दररोज भेटू लागले. त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती. जेम्सची पण गर्ल फ्रेंड त्याला सोडून गेली होती. तो रूबेलच्या दोन्ही मुलांना पण चांगला बोलत असे. मुलांना पण आवडत असे. एके दिवशी रेबेलने त्याच्याशी आपले प्रेम असलेले कबूल केले. त्यानेही कबूल केले. पण तो मानी असल्याने तिच्या घरी रहायला तयार नव्हता. रुबेलला त्याचा मानीपणा खूप आवडला. आपल्या पैशावर प्रेम करणारे खूप पाहिले होते. पण हा वेगळा होता. लवकरच रुबेल जेम्सशी लग्न करून आपल्या मुलांना सोबत त्याच्या छोट्याशा घरात रहायला गेली. रेडमीची भरारी तर अजूनच वाढत चालली होती. जेम्स आता रेडमीचा बाप म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला सर्वत्र खूप मान मिळू लागला. पण रेडमी व रूबेलचे या छोट्या घरात राहणं अवघड होऊ लागलं. नेहमी पार्टी, मोठमोठे लोक येणं. डायरेक्टर्स येणं चालू होते. जेम्स हे पहात होता. शेवटी तोच रूबेलच्या घरी जायला तयार झाला. पण एका अटीवर की तो तेथे आपल्या पैशावरच जगेलं. रूबेल तर पार हुरळूनच गेली. जेम्सने मात्र सर्व शिडी चढून पार केली होती.

जेम्स रूबेलच्या घरी आला. चार महिने तो आपल्याच पैशावर राहिला पण हळूहळू तो त्या दुनियेला भुलत चालला होता. रोजच्या पार्ट्या, मोठमोठे लोक, सुंदर स्त्रीया. तो रुबेलला गोड बोलून सर्व कारभार पाहू लागला. दोन वर्षे संपली, रेडमी आठ वर्षाची झाली होती. जेम्सचा विजा संपत आला होता. त्याला रशियातून लवकर अमेरिकेत परत जावे लागणार होते. त्याने रूबेलला अमेरिकेला चालण्यासाठी प्रवृत्त करू लागला. तिला तिच्या लहानपणीच्या आठवणी देऊ लागला. मग रूबेलला आपल्या मायदेशी परत जाण्याची इच्छा होऊ लागली. तिने लवकरच जेम्स बरोबर अमेरिका जाण्याचा निश्चय केला. रशियन इंडस्ट्रीमधे खळबळ माजली. तर अमेरिका खूश होती. एक नामवंत माॅडल देशाला मिळणार होती. रेडमी व तिचा भाऊ रुबेल सोबत जेम्स बरोबर अमेरिकेला गेले. पण जाताना रूबेलने रेडमीच्या वडिलांचे घर न विकता तसेच ठेवून गेली. त्याला एका कंपनीला भाड्याने दिले. अमेरिकेत आल्यावर तर रेडमीला तर खूप नाव मिळाले. प्रसिद्धी, पैसा मिळाला. जवळजवळ दहा वर्षे रेडमी अमेरिकेत राहिली. जेम्सनी तिच्या पैशावर अमेरिकेत एक मोठे घर बांधले व बिझनेस काढला. पण तो आता रुबेलकडे दुर्लक्ष करू लागला. आठ आठ दिवस तो घरीच येत नसे. अठरा वर्षाची रेडमी आणि वीस वर्षांचा तिचा भाऊ त्याच्या न येण्यावर आक्षेप घेत नसतं. पण रूबेल मात्र हबकून जायची. तिला जेम्स बद्दल नको नको त्या गोष्टी कळू लागल्या. आपले भविष्य परत पहिल्या सारखे होणार असे वाटू लागले. ती जेम्सशी भांडू लागली. पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि एके दिवशी जेम्सने आपल्या दोन मुलांसह पत्नीला घेऊन घरी आला. सोळा व चौदा वर्षाची अपत्य होती. रूबेलने चौकशी केल्यावर कळले की जेम्स पहिलेच लग्न केलेला होता. नोकरीसाठी तो रशियात गेला होता. तेथे त्याला रुबेल दिसली. त्याने तिची माहिती काढली. मग त्याने खूप मोठा प्लॅन केला. रुबेलच्या दुखती नसेवर बोट ठेवून तिला विश्वासात घेतले. आपला साधापणा दाखवून तिच्या मनात घर केले. मग तिच्या घरात प्रवेश केला. आपल्या देशाची ओढ दाखवून अमेरिकेत आणले. कारण तो रेडमीचा पैसा सहजासहजी अमेरिकेत आणू शकला नसता. रुबेलला सर्व कळल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. ती काही दिवस आजारी पडली. तिने जेम्सला घराबाहेर जायला सांगितले. पण काही फायदा झाला नाही. उलट ती व तिचे मुलं जेम्सच्या घरात राहत होती. हे त्याने दाखवून दिले. सर्व पैसा व घर स्वतः च्या नावावर करून घेतला. शेवटी रूबेल आपल्या मुलांना घेऊन परत रशियात परतली. चाळीस वर्षाची रेडमी पूर्णपणे हारली. दोन्ही नवऱ्यांनी फक्त पैशासाठी आपला वापर केला हे तिच्या मनाला लागले. ती आजारी पडू लागली. रेडमीने परत रशियात आपले माॅडेलचे काम सुरू केले. रेडमीच्या जाण्याने अमेरिकेत अनेक कंपन्या डबघाईस आल्या. तिच्या अॅडमुळे चालणाऱ्या त्या हळूहळू बंद पडू लागल्या. रेडमी वीस वर्षांची झाली. भाऊ पण या जाहिरातीच्या जगातच काम करू लागला. रेडमीकडे परत पैसा येऊ लागला. पण तिचे एकवीस वर्षे पूर्ण होण्या अगोदर तिची आई या जगातून निघून गेली. रेडमी खचून गेली. भाऊ पण तिच्याकडे जास्त लक्ष देईना. अमाप पैसा असूनही रेडमी एकटी पडली. तिचा एकवीसावा वाढदिवस होता. त्या दिवशी तिच्या फोटो काढण्यासाठी दोन फोटोग्राफर ला बोलावण्यात आले. त्यात राॅकी डिसूझा, राहणार गोवा, भारत. तो तिच्या नजरेस पडला. तो तर सतत तिलाच पहात असे.

राॅकी फोटो काढताना सारखा तिलाच पहात होता. रेडमीच्या ते लक्षात आले. तिला ते आवडले नाही. तुम्ही भारतीय लोक कधी एवढी गोरी मुलगी कधी पहात नाही का?

राॅकी हसून, नाही, एवढी गोरी सुंदर मुळीच नाही. तू तर अप्सरा आहेस, अप्सरा. व्हाॅट, अप्सरा, हु ईज अप्सरा. ती कोणी माॅडेल आहे का तुमच्या भारतातली.

खो खो हसत सुटला, राॅकी. नो नो ती अप्सरा कोणी माॅडेल नाही. शी ईज व्हेरी व्हेरी ब्युटीफूल लेडी गाॅड इन इंडियन. ओ असं का? एवढं बोलून रेडमी तेथून निघून गेली. पण खूप वेळ तिच्या डोक्यात राॅकीचे वाक्य घोळू लागले. पण दुसर्‍या दिवशी ती पुरती विसरून गेली. राॅकी रिकाम्या वेळात रेडमीवर नजर ठेवून असे. ती कुठे जाते, काय करते?

अशाच एका रात्री ‌माॅडेल लोकांची पार्टी होती. रेडमी त्या पार्टीला गेली खरी पण तिथे मन लागेना. येताना भावाला भेटायला गेली होती पण तिच्या प्रसिद्धीवर जळून तो तिच्याशी नीट वागत होता ना बोलत होता. आजही बोलला नाही. रेडमी त्याच दुःखात होती. तिथे तिला ‌एकटेपण वाटू लागल्याने ती तेथून बाहेर पडली. थोडीशी नशा चढली होती पण शुद्धीवर होती. तिने गाडी काढली व वाटेल तिकडे जाऊ लागली. मधूनच तिला हुंदका येऊ लागला. तिने एका जागी गाडी पार्क केली. गाडीतून खाली उतरून ती हळूहळू चालू लागली. पुढे समोर खोल दरी होती. ती कड्यावर थांबली. खूपवेळ उभा राहून पाहिल्यावर ती तेथेच एका मोठ्या दगडावर बसली. आईच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. पण तेवढ्यात तिच्या मागच्या उघड्या पाठीवर कोणाचा तरी हात फिरू लागला. ती झटकन उठली. मागे वळून पाहिले तर एक तीस पत्तीस वर्षाचा तरुण दारूच्या नशेत रेडमी बरोबर जबरदस्ती करू पहात होता. रेडमी त्याला प्रतिकार करू लागली. या झटापटीत तिने त्या माणसाला जोरात ढकललं. तो तोल जाऊन दरीत पडला. एक जोराची किंकाळी हवेत विरली. ते पाहून रेडमी थरथर कापू लागली. एवढा वेळ झाडामागे लपून बसलेली. व्यक्ती बाहेर आली आणि रेडमीला समजावू लागली. शांत हो रेडमी, शांत हो हे बघ आधी येथून चल. कोणी बघण्या अगोदर चल. या रस्त्यावर कॅमेराही नाही. तुला कोणी असं करताना पाहिलंही नाही.

नाही नाही, हे चुकीचे आहे. मी त्या व्यक्तीला खाली पाडलंय. माझ्या हातून एकाचा जीव गेलाय. मला पोलि‍सात गेलं पाहिजे. नाही रेडमी. तू पोलिसात गेलीस तर तुला फाशी होईल. तसंही तो तुझी अब्रु घेऊ पहात होता. तू जाणून बुजून त्याला थोडंच मारलसं. आपल्या संरक्षणासाठी तू लढत होतीस. तू हे चुकीचे केलेलं नाहीस. आधी तू गाडीत बस मग ठरवू काय करायचं. त्या व्यक्तीचं काय झालं हे न पहाताच त्या लपलेल्या व्यक्तीने रेडमीला गाडीत बसवून घरी आणलं.

पण कोण होता तो व्यक्ती?

रेडमी घरीआली तरी खूप घाबरलेली होती. तिच्या डोक्यातून जातंच नव्हतं की तिने कोणाला तरी दरीत ढकलून मारलंय. तिला घरी घेऊन येणारा तो तिला शांत करत होता. दोन दिवस झाले तरी रेडमीचा डोळा लागत नव्हता. शेवटी त्याने रेडमीला आपल्या देशात घेऊन जायचे ठरवले. त्याने तिला तसे सांगितले. ती तयार झाली कारण तिला यापासून दूर जायचं होतं. रेडमी त्याच्या सोबत निघून गेली. रशियन फिल्म इंडस्ट्रीमधे गडबड उडाली. रेडमी कोणाला ही न सांगता अचानक गायब झाली. तिचा भाऊही चकीत झाला. कुठे गेली असेल याचा त्यालाही अंदाज नव्हता. रेडमी मात्र त्याच्या देशात येऊन थोडी शांत झाली होती. सगळ्या पासून दूर कोणी ओळखीचे नाही. कुठले टेन्शन वा भीती नाही. तो ही तिची काळजी घेत होता. पण रेडमीच त्याच्यावर प्रेम नव्हतं. हळूहळू रेडमी झालेल्या गोष्टींला विसरून गेली. सहा महिने होतं आले होते. तेथे घडलेल्या गोष्टीवरून तिला कोणीही काहीही विचारले नव्हते. झाले ही तसेच होते. तो पिदाडा व्यक्ती कोण होता आणि तो दरीत पडला का, मेला का याची कोणालाही कल्पना नव्हती. फक्त रेडमी आणि तो त्याचे साक्षीदार होते. जे पळून आले होते. तो हळूहळू रेडमीला आपल्या बरोबर लग्न करण्यास भाग पाडू लागला. रेडमी नकार देत होती. शेवटी त्याने तिला बॅल्कमेल करायला सुरुवात केली. जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही तर तो रशियन पोलिसांना सांगेल की रेडमीच्या हातून खून झाला आहे. नकळत झाला तरी रेडमी या गोष्टीला घाबरते हे त्याला माहीत होते. तो दुसरा तिसरा कोणी नसून, खुद राॅकी डिसूझा होता. त्याच्या लंपटपणामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली होती. नुकताच त्याचा डायवोर्स झाला होता. त्याच्या मुलालाही बायको घेऊन गेली होती. पत्तीस छत्तीस वर्षाचा राॅकी बावीस वर्षांच्या मुली बरोबर लग्न करू पहात होता. एक तर त्याला लहान व सुंदर बायको मिळणार होती.

दुसरं ती कमावती होती. तिच्या पैशावर त्याला मजा करायला मिळणार होती. रेडमीची इच्छा नसतानाही तिने राॅकीशी लग्न केले. ती रेडमी राॅकी डिसूझा झाली होती. ती गोव्यात रहायला लागली होती. इकडे रशियात मात्र आठ महिने झाले रेडमीचा शोध चालू होता. अनेक लोकांनी तिच्यावर पैसा लावला होता. कोणातरी रशियन पर्यटकाने रेडमीला गोव्यात पाहिलं आणि आपल्या देशात परत गेल्यावर ही बातमी सगळीकडे पसरवली. अनेक लोक तिला शोधत गोव्यात दाखल झाले. अनेक जण रेडमीला परत रशियात जाण्यासाठी मागे लागू लागले. ती परत माॅडेलिंग करावे असे म्हणू लागले. पण रेडमीची परत माॅडेलिंग करायची इच्छा नव्हती. ती नकार देऊ लागली. तिला रशियात परत जायची भीती वाटू लागली. राॅकीला पैसा हवा होता. त्याने रेडमीला ब्लॅकमेल करून काम करायला तयार केले. पण प्रोडुसरांना गोव्यात अॅड करायला राजी केले. परदेशातील लोक गोव्यात, भारतात येऊन एका माॅडेलला घेऊन अॅड शुट करतात ही बातमी सगळीकडे पसरत गेली. रेडमी भारतातही प्रसिद्ध होऊ लागली. इथल्याही तिला अॅड, माॅडेलिंग मिळू लागले. पण हे सुख रेडमीला जास्त दिवस मिळणार नव्हते.

रशियातील काही प्रोड्युसर रेडमीवर धोका धडीची केस करू लागले. आमची अॅड न करता पैसे घेऊन, करार करून ती भारतात पळून गेली असे म्हणू लागले. शेवटी तेथील अॅड करण्यासाठी रेडमीला रशियात जाणे जरुरीचे होते. रेडमीला तेच नको होते. तेथे गेल्यावर ती पकडली गेली तर, पण राॅकी तिला म्हणाला, हे बघ रेडमी या गोष्टीला वर्ष होऊन गेलं. त्याचं काही कळाले असते आणि तूच मारलं असं कळाले असते तर आतापर्यंत. रशियन पोलीस तुला पकडण्यासाठी येथे भारतात आले असते कारण काही महिने झाले. तेथील लोकांना कळाले आहे की तू येथे आहेस. तिकडे सर्वत्र बातमी आतापर्यंत पसरली असेल. आता फक्त एक कर तेथे गेल्यावर प्रेस तुला विचारेल की तू अशी अचानक भारतात का गेली म्हणून. तेंव्हा तू उत्तर दे मी इथल्या या गोंधळाला आणि धाकधुकीच्या जीवनाला कंटाळून तेथे गेले होते. मनशांती शोधायला. मी खूप आनंदी आहे तिकडे जाऊन. रेडमीने तसेच केले. बरेच दिवसांनी आपल्या देशात व घरात ती आली होती. लहानपणीच्या अनेक आठवणी, आई व भावाच्या आठवणी तेथे होत्या. ती ज्या दिवशी पोहचली, त्या दिवशी भाऊ तिला भेटायला आला. आल्यावर नाही नाही ते बोलू लागला. काय वेडेपणा चालवलास, लाज आणलीस मला. इथलं सगळं सोडून पळून गेलीस. लोकांनी व मिडिया वाल्यांनी आम्हाला भंडावून सोडले. तू कोठे आहेस, कधी येणार? प्रोड्युसर तर जगूच देत नव्हते. किती काळजी वाटत होती. किती त्रास झाला आम्हाला. लाज नाही वाटली असं करताना. इतके वेळ बहीण भावंडांच्या भांडणात आपण कशाला बोलायचं म्हणून शांत राहिलेला राॅकी भडकला.

एक्सक्युजमी तुम्ही तोंड सांभाळून बोला. तिची त्या वेळी काय मनस्थिती होती याचा अंदाज तरी होता का तुम्हाला. एवढी काळजी होती तर आईच्या माघारी‌ आपली बहीण कशी जगत असेल याची विचारपूस केलीत का? तिचा पैसा फक्त महिन्या महिन्याला घेत राहिलात. तुम्हाला याची चीड होती की ती तुमच्यापेक्षा जास्त सक्सेस झाली. ती भारतात निघून गेल्यावर तुम्हाला पैसा मिळायचा बंद झाला.

ओ मिस्टर पण तुम्ही कोण आमच्या बहीण भावात बोलणारे. तुमच्या सोबत ती गेली होती का.

हो ती मा‍झ्या सोबत आली होती आणि मी तिचा नवरा आहे. तिच्या पेक्षा दहा वर्षांनी मोठा नवरा, आणि तेही भावाला न सांगता तिने लग्न केले. याचा भावाला खूप मोठा धक्का बसला. तो काही न बोलता उठून जाऊ लागला. इतक्या दिवसांनी भाऊ भेटला तो जातोय‌ पाहून तिने त्याचा हात पकडला आणि थांबवू लागली. पण तिचा हात झटकून तिच्याकडे न पाहताच निघून गेला. रेडमी त्या दिवशी खूप रडली. तिची काय चूक होती. ती सुंदर होती. सक्सेसफुल होती. आई तिच्याकडेच जास्त लक्ष देत होती. पण हे भावाला कधीही आवडत नव्हते हे तिला कळलंच नाही. रेडमी इथे आल्यापासून थोडी घाबरूनच राहत होती. रेडमी परत रशियात आली हे कळल्यावर कोणी तरी तिच्या पाळतीवर होतं, पण कोण? राॅकी तर सोबतच होता.

रशियात आल्यापासून रेडमीवर कोणीतरी नजर ठेवून होतं. याची जाणीव रेडमीला पण झाली होती. ती आतून घाबरली होती. पण तिने ते दाखवू दिलं नाही. तिची इच्छा होती की लवकरात लवकर अॅड पूर्ण करून भारतात जावं. एके दिवशी ती बेडरूममध्ये झोपली असताना तिच्या बेडरूमच्या खिडकीतून कोणीतरी आत शिरलं. हळूहळू रेडमीच्या पलंगाकडे जाऊ लागलं. लाईट बंद असली तरी रेडमीला झोप आलेली नव्हती. कारण रात्रीचे दोन वाजत आले तरी तिचा नवरा घरी आला नव्हता. तो इथे मस्त पबमधे जाऊन दारू पिऊन पोरीसोबत धिंगाणा घालत बसत असे. आजही तसंच करत होता. रेडमीला बोलायला भाग नव्हते. एकदा बोलूनही बघीतलं. तर तो म्हणाला, मा‍झ्या गोष्टीत नाक खूपसू नकोस. ‘मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी ठरवणार’, तू फक्त आपल्या अॅड कर, माॅडेलिंग कर आणि नोटा छाप. नाही तर तुला माहितच आहे मी काय करू शकतो. हे ऐकून रेडमी हादरलीच. आपला नवरा या थराला जाऊ शकतो. आपल्याला फक्त पैसे छापण्याची मशीन समजतो. लग्न होऊन दोन वर्षे होतं आलेली पण मुल नको म्हणतो. तिची फिगर खराब झाली तर काम मिळणार नाही म्हणतो. पण रेडमीला हे सर्व सोडून, मुल करायचं. नवरा, मुल आणि घर सांभाळायचं. इतर बायका सारखं आपण जगायचं असं वाटत होतं. पण राॅकी यासाठी तयार नव्हता. हा विचार चालू असतानाच तिला रूमध्ये कोणाची तरी चाहूल लागली. प्रथम तिला वाटलं राॅकीच आहे. रात्र खूप झाल्याने तो गुपचूप रुममध्ये येत असेल. पण तिला लगेच लक्षात आलं की राॅकी तशातला नव्हता. तो उशिरा जरी आला तरी तो तिला झोपेतून उठवत असे. कधी पाणी, कधी जेवण, तर कधी पाय चेपून घेत असे. पण रेडमीजवळ कमी जात असे. कुठे ती चुकून प्रेग्नंट राहिली तर आपली कमाई बुडेल. वरून मुलाचं लचांड मागे लागेल याची भीती होती. राॅकी नाही हे जाणवल्यावर ती घाबरली उठून ओरडणार इतक्यांत ती व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तिचं तोंड दाबलं. त्या धडपडीतही तिने टेबललॅम्प लावला. त्याच्या उजेडात जो कोणी दिसला त्याला पाहून रेडमीचे डोळे विस्फारले.

रेडमीचे डोळे विस्फारले होते. तोंड बंद असल्याने तिला चिरकता येत नव्हते. ती हा जिवंत आहे. तो इथे काय करतोय. मला मारायला आला की काय. तो त्या दिवशी माझा धक्का लागून दरीत पडला होता. मग इथे कसा? तेवढ्यात त्याच वेळेला पॅसेजच्या खिडकीतून‌ कोणीतरी आत शिरलं. तो अंधारात हळूहळू पुढे सरकू लागला. पण त्याचा टेबलला धक्का लागला आणि वर ठेवलेलं लोखंडी वास खाली पडलं. खूप जोराचा आवाज झाला. ती तिकडे वळून पाहू लागली. तिकडे अजून कोण आहे. तेवढ्यात तिने परत मान सरळ केली तर समोर कोणी नव्हतं. ती घाबरून धडपडून उठली. ती खिडकीकडे पळत गेली. तिला बाहेर कोणीही दिसलं नाही. ती परत वळाली आणि बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी तेवढ्यात तिचं व्यक्ती आत आली.

जेकब तू आणि इथे, एवढ्या रात्री इथे काय करतो आहेस?

जेकब रेडमीचा बालमित्र, तिच्या वर खूप प्रेम करायचा पण कधी सांगितले नाही.

रेडमी तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. पण तू अचानक गायब झालीस? कोठे होतीस माहित नव्हतं. इथे परत आल्यापासून तुला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. पण राॅकीने रेडमीच्या ओळखीच्या कोणत्याही लोकांना आत जाऊ देऊ नकोस असं सेक्युरेटीला सांगितले आहे. म्हणून ते झोपले की आत आलो. पण तुझी खोलीच सापडेना. पण तू एवढी घाबरल्या सारखी का वाटत आहेस. ते मी अं, अं

रेडमीला काही सांगता येईना, पण काहीतरी सांगावं लागणार तर होतं. ती म्हणाली, बाहेर आवाज झाला म्हणून.

रेडमी ऐक त्या दिवशी तुझ्या धक्क्याने तो माणूस दरीत कोसळला. हे मी पाहिलं आहे. रेडमीला खूप मोठा धक्का बसला. आता हा काय आपल्याला ब्लॅकमेल करतोय काय माहित. असं तिला वाटलं.

पण घाबरू नकोस, मी कोणाला सांगणार नाही किंवा ब्लॅकमेल करणार नाही. फक्त एवढं सांगायचं होतं की त्या माणसाला रॉकीने मुद्दाम तेथे पाठवलं होतं. तो फक्त तुला घाबरवणार होता आणि राॅकी तुला वाचणार होता. तुझ्या नजरेत हिरो बनणार होता. पण झाले वेगळेच. मला माहित आहे त्याने तुला ब्लॅकमेल करूनच लग्न केले आहे. पण रेडमी मी तुझा मित्र आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुला काही होऊ देणार नाही. तू मला तुझा सेक्रेटरी कर. बघ सगळ्यांना ताब्यात ठेवतो. एवढं बोलून त्याने रेडमीला कपाळावर कीस केलं आणि निघून गेला. पण तो दिसलेला जिवंत होता की भूत.

जेकब निघून गेला पण रेडमीला खूप वेळ झोप आली नाही. वासच्या आवाजाने तिची आया, मेड आणि इतर नोकर बाहेर जमा झाले होते. त्यांना समजावून पाठवलं. पण जेकबच्या अगोदर जो कोणी आला होता तो खरंच जिवंत आहे की त्याच भूत? राॅकीतर अजून घरी आला नव्हता. त्याने आपली रुम वेगळी केली होती. तो रेडमीकडे खूप कमी येत असे. काही केल्या तिचे डोळे मिटत नव्हते. ती खिडकीतून बाहेर अंधारात डोळे फाडून पहात होती. कोणी दिसत नव्हते. शेवटी तिने सर्व खिडक्या गच्च बंद केल्या आणि पुस्तक वाचत खुर्चीत बसून राहिली. सुमारे पाचच्या दरम्यान तिला डोळा लागला. मेडनेही सकाळी तिला लवकर कोणी उठवलं नाही. राॅकी एकदा तिच्या खोलीत डोकावून गेला. खुर्चीत झोपलेली पाहून आपलीच वाट पाहत होती वाटतं असा विचार करून तो तिला न उठवता आपल्या खोलीत झोपी गेला. सुमारे अकराच्या आसपास रेडमीचे डोळे उघडले. ती जागी झाली, फ्रेश होऊन राॅकीशी बोलण्यासाठी गेली. तो उठून खुर्चीत चहा पीत बसला होता. ती आत गेली. राॅकी मला तुझ्याशी बोलायचं आहे. हं बोल, काय बोलायचं आहे.

राॅकी मी ज्या माणसाला दरीत ढकलले, त्याला तू भाड्यानं आणलं होतंस‌ मला घाबरायला? तिचा हा प्रश्न राॅकीसाठी बाॅम होता. तो आश्चर्याने पाहू लागला. पण लवकर सावरला. तुला कोणी सांगितले हे, उगाच काहीतरी बोलू नकोस. मी आता पोलिसांना बोलावून तुला त्यांच्या हवाली करेन. हो बोलवचं? मी पण सांगेन तू त्याला भाड्यानं बोलवलं होतंस मला घाबरवयाला. मी घाबरून सुटण्यासाठी घडपड करत होते आणि तो दरीत पडला. मी नामांकित माॅडेल आहे. माझ्या ओळखीने मी माझी शिक्षा कमी करून घेईन. पण तुझं काय? एवढं बोलून ती जाऊ लागली. पण क्षणभर थांबून ती म्हणाली, काल तो आला होता घरी, त्यानेच मला सांगितले हे. अजून मला काहीतरी सांगणार होता पण बाहेर आवाज झाला आणि तो पळून गेला. रेडमी निघून गेली. पण राॅकी तोंड वासून तेथेच बसून राहिला. काय भानगड आहे ही? तो खरंच जिवंत आहे का? की त्याचं भूत आहे. माहित नाही, लवकर इथून निघाले पाहिजे. भारतात परतलं पाहिजे. तो सगळ्या प्रोड्युसरांना भेटून लवकर अॅड संपवायला सांगितल्या. नवीन‌ सगळ्या रद्द केल्या. पुढचा महिनाभर तो‌ त्याला शोधत होता. पण तो सापडला नाही. जेकब त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता.

जेकब राॅकीच्या सर्व गोष्टी वर लक्ष ठेवून होता. तो सगळ्या बातम्या रेडमी पर्यंत पोहचवत होता. रेडमीने जुन्या मॅनेजरला काढून जेकबला मॅनेजर केले. राॅकीला ते आवडले नाही. एक तर तो तिचा मित्र होता. दुसरं हा आता जास्त काही भ्रष्टाचार करू शकत नव्हता. तिला फसवू शकत नव्हता. पहिला मॅनेजर राॅकीचाच ओळखीचा होता. पण राॅकी या बाबतीत काही करू शकत नव्हता. त्याने लवकरच आपण परत भारतात जात आ होतं असं रेडमीला सांगितले. रेडमीलाही तेच हवं होतं. येथे त्या माणसाच्या भुताचं टेन्शन होतं किंवा तो जिवंत असेल तर काही करेल असं वाटत होतं. ती चुपचाप राॅकी बरोबर भारतात निघून आली. आपलं तिथलं घर‌ भाड्याने देऊन ती रक्कम रेडमीच्या नव्या आकांउटवर जमा करायला सांगितले. रेडमी भारतात निघून आली. येथे ती शांतपणे काम करू लागली. वर्ष निघून गेले आणि तिला परत आपण आई व्हावं. संसार करावा ही इच्छा उफाळून आली. पण राॅकी याकडे दुर्लक्ष करू लागला. त्यातच त्याने ऐमेलीलाही भारतात आणलं होतं. तो जास्त करून तिच्या सोबतच राहू लागला. रेडमी परत एकटी पडली. ती नेहमी डिप्रेशनमध्ये राहू लागली. रेडमीची अवस्था पाहून जेकब बैचेन होई. तो नेहमी तिला हसत ठेवण्याचा प्रयत्न करत असे. ती हळूहळू जेकबकडे आकर्षली जाऊ लागली. तिचं जेकबवर प्रेम जडलं. खरं तर हे चुकीचे होते आपला नवरा सोडून दुसऱ्या वर प्रेम करणे चुकीचे होते. पण राॅकी तिला जवळ करत नसे, एकटे पण भयानक होते. राॅकी तिच्या पैशावर मजा मारत असे. अशातच रेडमीला दिवस गेले पण रेडमीने ही गोष्ट राॅकी पासून लपवली. एक तर ते मुल जेकबचं होतं आणि दुसरं तो ते मुल पाडण्यासाठी तिला बळजबरी केली गेली असती. कारण तिची माॅडेलिंग थांबली असती.

रेडमी गरोदर असल्याने तिची तब्येत खराब राहू लागली. रेडमीने डॉक्टरलाही खरी परिस्थिती सांगितली होती त्यामुळे डॉक्टर त्याला थातूरमातूर उत्तरे देत होती. पाचवा महिना संपून सहावा लागला आणि रेडमीची तब्येत ठीक राहू लागली. ती जाड व पोट सुटलेली दिसू लागली. राॅकी तिच्यामागे व्यायाम कर वजन कमी कर. तुला काम मिळणार नाहीत म्हणून लागला. पण तरी एका रिपोर्टरने तिची गुप्त बातमी काढली आणि रेडमीला दिवस गेल्याचे सगळीकडे पसरवले. राॅकी तर शाॅक बसल्या सारखाचं झाला. सहावा महिना लागला आणि बायकोने आपल्याला काही सांगू नये. मी तर एवढी काळजी घेत होतो मुल होऊ नये म्हणून. तिच्याकडे जास्त जातही नव्हतो. मग त्याचा संशय बळावू लागला. त्याने ऐके दिवशी दारू पिऊन धिंगाणा घातला.

रेडमी खरं सांग हे मुल कोणाचं आहे. मी तर तुला मुल होऊ नये म्हणून किती काळजी घेत‌ होतो. नकोय मला हे मुलं.
पण मला हवंय राॅकी, तुला दारू पिणे, पैसे उडवणे‌ आणि वेश्यासोबत फिरणे याच्याशिवाय मी कधी दिसते का? पण मला हे एकटेपण नको वाटतं होतं. मी डिप्रेशनमध्ये जात होते. 

तुला तर दारूच्या नशेत लक्षातही राहत नाही की तू मा‍झ्या खोलीत कधी येतोस‌ आणी कधी उठून जातोस. चल तुला संशय येत असेल तर डिएनए करून घेऊ. जेंव्हा आपली बायको डिएनए करायला तयार आहे म्हणजे हे मुल माझंच आहे. यावर त्याचा विश्वास बसला. पण त्याला मुल नको होतं. ती किंवा तिची मुलं त्याला अडचण ठरणार होती. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली होती आणि या कारणासाठीच सोडून दिले होते. पुढचे दोन वर्षे पैसे यायचे‌ बंद‌ होणार होते. रेडमीला सुखाचा संसार करायचा होता पण उलट राॅकीला संसार नको होता. जेकब तिच्यासोबत संसार करायला तयार होता पण रेडमी अडकली होती. तिला राॅकी पासून सुटता येत नव्हते. राॅकी बरोबर राहणे मजबुरीच होतं. त्याचं खरं रुप समोर आल्यावर तिला त्याच्या बद्दल प्रचंड राग आला होता. पण जेकबच्या मदतीने आपले गरोदर पण सुकर केले. राॅकी याकाळात तिला काही लागत का? काही त्रास होतोय का? काही पहात नसे. आतातर ती गरोदर असल्याने तिच्याकडे येण्याचे कारण ही संपले होते. तो आतातर जास्त वेळ ऐमेली सोबत घालवू लागला. त्यातच त्याला नवीन मैत्रिण नेगी मिळाली. ती अमेरिकन होती. काही कामानिमित्त भारतात म्हणजेच गोव्यात आली होती. ऐमीली सोबत मैत्री झाली. पुढे ती राॅकीचीही मैत्री झाली. ऐमीलीला रॉकी तिच्यासोबत राहिलेला, झोपलेला आवडेनासा झाला. तेंव्हा त्याने तिला रशियात परत जायला सांगितले. त्यामुळे ती चूप बसली. इकडे रेडमीची परिस्थिती बिकट होतं चालली होती. तिला गरोदरपण मानवेना. त्रास होऊ लागला. अशातच तिला एके दिवशी चर्चमध्ये एका मेडची ओळख झाली. तिचं नाव अॅनी. रेडमीला आपली आई परत मिळाल्या सारखी वाटली. तिने अॅनीला आपल्याकडे कामाला बोलवलं. ती पण आली. तिची खूप छान काळजी घेऊ लागली. रेडमीन आपल्या आईचपण नाव अॅनी होतं, असं जेव्हा मेड अॅनीला सांगितले. तेव्हापासून तर अॅनी तिची आईच झाली. रेडमीचे दिवस भरले आणि तिला गोड व सुंदर मुलगी झाली. रंग रेडमी सारखा तर तोंडवळा जेकब सारखा दिसायचा. राॅकी इंडियन गोरा असला तरी परदेशी लोकासारखा पाढरा शुभ्र नव्हता. रेडमीन तिचं नाव अॅडमी ठेवलं. अॅनीच अॅ आणि रेडमीच डमी. वर्षभरातच राॅकीने रेडमीला आपले वजन कमी करुन काम सुरू करायला लावले. रेडमीची खरंतर इच्छा नव्हती. मुलगी एक वर्षाची झाली की पाहू असं वाटायचं. भरपूर पैसा आहे. बस्स आता काम करणे. उलट राॅकीने काहीतरी बिझनेस करावा असं वाटायचं. पण राॅकी बायकांच्या जीवावर जगणारा. खंरतर रेडमीपण इतर बायकांप्रमाणे त्याला सोडून गेली असती पण ती राॅकीच्या जाळ्यात अडकली होती. तिला त्यातून सुटता येत नव्हते. बघता बघता दोन वर्ष निघून गेले. जेकब रेडमीला राॅकीला तलाक देऊन त्याच्यासोबत चलायला म्हणत होता. राॅकीनं काही केलं तर तो सोडवेल, पण रेडमी तयार नव्हती. तिला राॅकीचा स्वभाव माहीत होता. तिला काही झाले तर आपल्या मुलीच काय होईल ही भीती होती. शेवटी जेकब कंटाळून तेथून निघून गेला. राॅकी खूप खूश होता. रेडमी मात्र परत एकटी पडली. आतून कोलमडली. तिने जेकबला परत येण्यासाठी विनवणी करू लागली. जेकब भारतात परतही आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रेडमीची मुलगी पाळणा घरातून गायब झाली.

रेडमीची मुलगी मिळत नव्हती. रेडमीने रडून गोंधळ घातला होता. पोलीस चौकशी करत होते. रिपोर्टरची गर्दी वाढत होती. रेडमीला वाटत होते की जेकबनेच तिच्या मुलीला पळवून नेले आहे. ती जात नाही पाहून असे काम केले असेल. पण जेकब जेव्हा तिच्याकडे परत आला तेव्हा त्याला यातले काहीच माहित नव्हते. पोलीस त्याला आत येऊ देत नव्हते. दोन तीनदा प्रयत्न करून पाहिला पण ते‌ ऐकत नव्हते. तो कंटाळून समोरच्या कट्ट्यावर बसला. अॅनीने वरून खाली येत असताना गेटवर काय चालले आहे हे पाहण्यासाठी खिडकीतून बाहेर बघितले तर तिला जेकब बसलेला दिसला. अॅनीने पळत खाली जाऊन रेडमीला ही‌ बातमी दिली. रेडमी मागचा पुढचा विचार न करता बाहेर पळाली. जेकब, जेकब माझी मुलगी कुठे आहे. मला परत दे प्लीज. जेकब ते ऐकून गेटकडे आला. पोलीस तेव्हाही आत जाऊ देत नव्हते. रेडमी गेट बाहेर आली. पण जेकब जवळ पोहचण्या अगोदर रिपोर्टरनी तिच्या भवती गर्दी केली. पोलीस रेडमीला आत नेऊ लागले. ती जेकब जेकब म्हणून ओरडत होती. एका पोलिसाच्या ते लक्षात आले. त्याने त्याला आत घेतले. रेडमी त्याच्याजवळ खूप रडली. पण राॅकी मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना दुःख ना काळजी होती. त्याला आपले मुल हरवलं याचे काहीच वाटत नव्हते. उलट तो शांत होता. आपल्या मागची कटकट गेली असे त्याला वाटत होते. रेडमीला राॅकीचा संशय येत होता. तेवढ्यात राॅकीला पैशासाठी फोन आला. हॅलो राॅकी, तुझी मुलगी माझ्याजवळ आहे. पोलिसांना काही सांगू नको, नाहीतर तिला मारुन टाकेन. संध्याकाळी मरीना बिचवर‌ दहालाख घेऊन ये. तेथे एक लाल रंगाची होडी दिसेल. त्यात‌ पैसे ठेव. पुढे मंदिराजवळ तिला सोडू. पोलिसांनी हा काॅल रेकॉर्ड केला. पण राॅकीला हा आवाज आपण पहिला पण ऐकला आहे असे वाटू लागले. तेवढ्यात त्याला आठवले की त्याचा सावत्र भाऊ‌ वेल्सन डिसुझा याचा आहे.

राॅकीने वेल्सनचा आवाज ओळखला. पण पोलिसांनी विचारले तर काही बोलला नाही. पोलिसांनी तो फोन रेकॉर्ड केला होता. राॅकी अॅडमीसाठी एकही रुपया द्यायला तयार नव्हता. तसंही ती मुलगी त्याला नकोच होती. पण रेडमीने रडून गोंधळ घातला होता. जेवणखाणं सोडून दिले होते. ती आजारी पडली होती. जेकब तिची काळजी घेत होता. वेल्सनला राॅकी विरोध करू शकत नव्हता. किरण वेल्सन एक कुख्यात गुंड आणि स्मगलिंग करत होता. अनेक अवैध धंदे तो करत होता. त्याच्याशी वैर घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. रेडमीची तब्येत जास्तच खालावली होती. शेवटी रेडमीला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या मुलीला परत आणणे जरूरीचे आहे हे राॅकीने ओळखले पोलिसांना वेल्सन कोठेही सापडत नव्हता. रेडमीला जेकबनेच हे केले असेल असे वाटत होते. त्यामुळे रेडीमीवर जेकब नाराज होता.

रेडमी तू चुकत आहेस, मी आपल्या मुलीला काहीही केलेलं नाही. तिला मी पळवले नाही .तू चुकीचा विचार करत आहेस. मी इथे नव्हतोच. मला दहा लाख घेऊन काय करायचे आहे. मला तर तू आणि माझी मुलगी हवी आहे. मला तुमच्यासोबत सुखाचा संसार करायचा आहे. तेवढ्यात रेडमीला कळाले की तिच्या मुलीला राॅकीच्या भावाने पळवले आहे. ती दहा लाख द्यायला तयार झाली. राॅकी पण तयार झाला. पण त्याला एकदा वेल्सनशी बोलायचे होते. तो निरोप त्याने त्याला फोनवर दिला पण वेल्सनने नकार दिला.

वेल्सन मुरलेला गुंड होता. राॅकीला फक्त आपले पैसे मिळवायचे होते. गोड बोलून मुलगी पण परत आणणार होता. शेवटी नाईलाजाने राॅकी पैसे घेऊन निघाला. पोलीस त्याच्या मागावर होते. राॅकीलाही माहित नव्हते. पण बिचवर‌ पैसे ठेवून जेव्हा तो मुलीसाठी वाट पहात थांबला तेव्हा त्याला वेल्सनची बोट पैसे घेऊन पळून जाताना दिसली. मागे पोलीस जाताना दिसले. तो गांगारला, हे कधी आले? मी तर बोलवलं नव्हतं. ओ गाॅड, पैसे पण गेले, मुलगीपण नाही मिळाली. तो डोक्याला हात लावून बसला. थोड्या वेळाने पोलीस रिकाम्या हातांनी परत आले. ते राॅकीला रागावू लागले. तुम्ही आम्हाला न सांगता पैसे द्यायला आलातच कसे?

अहो, ते निदान मला मुलगी तरी दिले असते, तो माझा सावत्र भाऊ होता. माझं ऐकला असता. पण तुम्ही येऊन घोळ घातलात. आता हातातून पैसे ही गेले, मुलगीपण गेली. मी रेडमीला काय सांगू?

इकडे रेडमी चातका सारखी वाट पहात बसलेली. घरी आल्यावर राॅकीने घडलेला प्रसंग सांगितला. रेडमीला गरगरल्यासारखे झाले. ती बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात दाखल केले गेले. ती शुद्धीवर आली तेव्हा तिला वेड लागलं होतं. तिला पुढच्या ट्रिटमेंटसाठी मेन्टलं हाॅस्पीटलमधे हलवलं.

आज जाॅर्ज जास्त माशा पकडण्यासाठी लवकरच समुद्रात उतरला. गाणे गुणगुणत तो बोट चालवू लागला. अर्धा तास गेला असेल आणि त्याला बोटीच्या तळघरातून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आयला, मुलगी कोठून रडतेय‌ बे? मला चढली काय, ये शंकर तुले पण ऐकू आले काय रे? हा जी मालक, मले पण ऐकू आले नव. पोट्टीचा आवाज. ते‌ हळूहळू खाली उतरू लागले. ते दोघे नावाडी खाली आले तर समोर एक दोन वर्षे वय असलेली सुंदर आणि परदेशी मुलगी रडत होती. बाजूला एक बॅग ठेवलेली होती. त्या दोघा पैकी एक जण मुलीजवळ गेला तर दुसरा बॅग उघडून बघू लागला. बाबो, एवढा पैका, कोण ठेवला असेल बे. ही पोट्टी कोणाची असेल. इथं काय करायली. ही एकटीच है न बा इथं. तेवढ्यात त्या दुसऱ्यान खिशातून पेपर बाहेर काढून त्यातली बातमी वाचू लागला. ही हरवलेली मुलगी रेडमी या प्रसिद्ध माॅडेलची असून तिला विल्सन या गुंडाने पळवली आहे. ती कोणाला दिसली तर या क्रमांकावर संपर्क साधावा. खाली रेडमीचा, पोलिसांचा नंबर आणि रेडमीच्या घराचा पत्ता लिहलेला होता. ही बातमी ऐकून पैसे पाहणारा म्हणाला. अबे चल हिला तिच्या आईकडं हवाली करू आणि अजून दोन लाख कमवू. हे पण पाच सहा लाख असतीलचं. नाय, बे, असं केलं तर पोलीस आपल्याला त्या गुंडाची माणसं समजून आत टाकतील. वरून हे बॅगेतील पैसेही जातील. तो वेल्सन भयानक गुंड आणि स्मगलर हाय. आपले तुकडे करलं. चल पटकन इथून संध्याकाळी बघू. काय ते. त्यांनी पटकन बोट किनार्‍याकडे वळवली. किनार्‍यावर चहूकडे पाहून पटकन ते खाली उतरले. एकाने अॅडमीला उचलले तर ऐकाने बॅग. घरी नेऊन अॅडमीला दूध पाजले. किती वेळ तरी उपासी पोर ती. पटकन झोपीपण गेली. या दोघांनी ते पैसे मोजले दहा लाख होते. दोघांनी वाटून घेतले आणि अंधार पडण्याची वाट पाहू लागले. त्यांना काहीही करून त्या मुलीला रडू द्यायचे नव्हते. नाहीतर आसपासच्या लोकांना कळाले असते किंवा गुंडांना.

झाले असे की वेल्सनने आपल्या बोटीला या दोघांच्या बोटीजवळ उभी केले होते. या बोटीत मुलीला ठेवून तो आपल्या बोटीत पैसे घेणार होता. काही गडबड झाली तर तो त्या मुलीला वापस देणार नव्हता. त्या मुलीसोबत एका माणसाला ठेवलं होतं. त्याने तिला झोपेचं औषध देऊन झोपवलं होतं. झालं तसंच पोलीस आले आणि वेल्सनला पळावे लागले. त्या गडबडीतही त्याने पैशाची बॅग बाजूच्या नावेत आपल्या माणसाकडे फेकली आणि पळून गेला. पोलीस गेल्यावर हाही निघून जाणार होता. बराच वेळ पोलीस असल्याने त्याला जाता येईना. खूप भूक लागली होती. मुलगी तर झोपली होती. बोट घ्यायला पण कोणी आले नव्हते. त्याने विचार केला. पोलीस असेपर्यंत आपण जेवून येऊ. तो नावाड्याचे कपडे घालून निघून गेला. इकडे ज्यांची बोट होती ते आले. मुलगी व पैसे घेऊन गेले. थोड्या वेळाने तो आला तर बोट तेथे नव्हती. ना मुलगी ना पैसा.

तो घाबरून तेथून निघून गेला. बाॅस आता जिवंत नाही सोडणार, त्यापेक्षा पोलिसांना सगळं खरं सांगावं म्हणून तो पोलिसात गेला. इकडे हे दोघे संध्याकाळ व्हायची वाट पाहू लागले. त्या मुलीला जेवू घालून संध्याकाळी परत झोपवले. अंधार पडला की तिला रेडमीच्या घराकडे एका गाडीत घेऊन गेले. कोणी नाही पाहून त्यांनी घराच्या कोपऱ्यावर झोपवून पळून गेले. थोडा वेळ गेला आणि अॅडमी झोपेतून उठली. शेजारी कोणी दिसेना, त्यात अंधार ती जोराने रडू लागली. तेवढ्यात जेकब घर सोडून आपल्या देशात जाण्यासाठी निघाला होता. त्याने अंधारात एक लहान मुलगी रडताना पाहिली. अरे, काय झालं बाळा, का रडतेस, तुझी आई आणि बा, वाक्य पूर्ण होण्या अगोदरच त्याला तिचा चेहरा दिसला. तो तिला पाहून आश्चर्यचकीत झाला. ती रडत त्याला बिलगली. त्याने तिला उचलून परत आत आणलं. राॅकी जेकबला परत येताना पाहून चिडला पण त्याच्या हातात अॅडमी पाहून तोही दचकला. अरे, तुला ही कोठे सापडली.

मी हिला घराबाहेर पाहिलं. रडत थांबली होती. राॅकीने लगेच पोलिसांना कळवले. पोलीस येऊन जेकबला विचारलं. जेकबने हे घडले ते सांगितले, अॅडमीला विचारले, बेटा तू कोणा सोबत आली तर ती एवढंच म्हणाली, न्यू अंकल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेक केले तर एक काळी गाडी येऊन तिला सोडून गेले. अंधारात गाडीचा नंबर दिसला नाही. पुढचा शोध‌ घेऊ म्हणून पोलीस निघून गेली. राॅकीला प्रश्न पडला की अॅडमीला कोण सांभाळणार, अॅनी पण गावी निघून गेली होती. राॅकीला अॅडमीची अडचणीचं वाटत होती. शेवटी जेकब तिला घेऊन जातो म्हणाला. राॅकीने सुटकेचा नि:श्वास टाकला.

तब्बल दोन वर्षांनी रेडमी ठीक होऊन घरी आली होती. आपल्या मुलीच्या फोटोसमोर रडत बसली होती. तिच्या फोटोला हार घालून तिच्या मृत्यूचा शोक करत बसली होती. पण राॅकी तिला सांगत नव्हता की तिची मुलगी जिवंत आहे आणि जेकब जवळ आहे. हळूहळू परिस्थिती सुधारली. रेडमी परत माॅडलिंगच काम करू लागली. परत सगळीकडे तिचं नाव होऊ लागलं. जेकब मात्र रेडमी एकदाही त्याला बोलली नाही. आपल्या मुलीबद्दल चौकशी केली नाही. तो तिच्यावर चिडला. त्याने रेडमीला गायब करायचं आणि आपल्याकडे आणायचं ठरवलं.

जेकबचा असा विचार सुरू होता आणि आता पेपरला बातमी होती की रेडमीचे अपहरण झाले आहे. पण कोणी केलं होतं तिचं अपहरण? कुठे गायब झाली होती ती? यामागे जेकबचा हात होता की राॅकीचा की अजून कोणाचा कळायला मार्ग नव्हता. सगळ्या फिल्म जगतात खळबळ माजली होती. अनेक प्रोड्युसर टेन्शनमधे आले होते. तिच्यावर काही चित्रपटांसाठी, तर काही माॅडलिंगसाठी, तर काही अॅडसाठी पैसे लावले होते. या वेळेसही ती स्वत: च कोठे पळून तर गेली नव्हती. रोज रिपोर्टर तिच्या घरासमोर दिवसभर ठिय्या मारून होते. काही बातमी मिळते का पाहण्यासाठी धडपडत होते. आज रेडमी गायब होऊन तिसरा दिवस होता. महाराष्ट्रातून काही सिबीआय पोलिसांना बोलवण्यात आले होते. त्या सकाळी सकाळी रेडमीच्या घरासमोर एक पोलीस व्हॅन येऊन थांबली. मागोमाग एक जीप पण आली. इन्स्पेक्टर विजय देसाई त्या गाडीतून खाली उतरले. त्यांनी आपल्या सोबत डिटेक्टीव्ह प्रभू आणि इन्वेस्टीगेटेशन करण्यासाठी सिमा रंजन यांना आणलं होतं. हे तिघे जात्याचे हुशार होते. हे त्रिकूट एकत्र आले म्हणजे काहीतरी लवकरच शोधणार हे नक्की होतं. या त्रिकुटाच्या जाळ्यातून आत्तापर्यंत एकही गुन्हेगार सुटला नव्हता. विजय देसाई यांनी आपली नजर सर्वत्र फिरवायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर विजय देसाई रेडमीच्या घराचा कोपरानकोपरा शोधत होते. बाहेर अंगणात कोणी आले होते का हे ही पहात होते. तेवढ्यात कांबळेनी सांगितले की घरात बेडरूम सोडून सर्वत्र कॅमेरे लावलेले आहेत. ते सिसीटिव्ही रुममध्ये गेले. इकडे कोणी आले होते ते चेक करू लागले. पण अंधारात तेवढं काही दिसत नव्हते. पण खूप चेक केल्यावर गेटसमोर एक गाडी थांबली. रेडमी त्यातील व्यक्तीला बोलत असताना त्याने तिला आत ओढले आणि गाडी निघून गेली. गाडीचा नंबर सिसीटिव्ही कॅमेरात दिसला नाही. माणसाचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता. बराच वेळ शोधूनही काही सापडलं नाही. देसाई परेशान होते. पण एवढं कळाले होते की हे कीडनॅपींगची केस आहे. सिमा आणि जासुस हेही आपापल्या कामाला लागले होते.

सर मला काही बातमी हाती लागली आहे.

प्रभू तू हाॅटेलवरच थांब मी व सीमा तिकडे येतोय. सिमा चल प्रभूला काहीतरी कळाले आहे. आपण निघूया. सीमा आणि विजय देसाई आपल्या टीमला घेऊन निघाले.
रुम नंबर ४२० मध्ये सगळ्यांची मसलत सुरू झाली. हे प्रभू तुला तुझ्या रुमचा दुसरा नंबर मिळाला नाही. काय तर चारसो बीस. तुझ्या सारखाच आहे बघ. पूर्ण बत्तीसी दाखवत प्रभू हो म्हणाला. बरं ते जाऊ द्या सर व्हिक्टीम म्हणून अनेक लोक माझ्या समोर आले आहेत. यापैकीच कोणीतरी हे अपहरण केलेले आहे. पण एक कळत नाही सर. जो कोणी आहे तो पैसे मागत नाहीये. त्याचा अजूनही फोन आलेला नाही म्हणजे त्याला पैसा नको आहे तर हे अपहरण दुसऱ्याच कारणासाठी झाले आहे. हो हे मलाही वाटत आहे. पण तू व्हिक्टीमचे नावे सांग पटकन.

१ राॅकी
२ जेकब
३ वेल्सन डिसुझा
४ रिचर्ड गेल
५ सॅमसन पॅमेल
६ अॅनी 

काय एवढे रेडमीचे दुश्मन होते. मला एक एक करून सगळ्यांची माहिती सांग. सीमा हे लिहून आणि रेकॉर्ड करून मला हवंय. हो सर मलापण काही माहिती कळली आहे. त्याची पण शहानिशा करते.

सीमा तुला काय काय कळलंय? देसाई विचारले. सर मला एक गोष्ट कळाली आहे की जेकब रेडमी कीडनॅप होण्याच्या एक दिवस अगोदरच भारतात आणि गोव्यात आला आहे. तो रेडमीला पळवून नेण्याच्या इराद्याने. हाॅटेल रेडीसन येथे तो थांबला आहे. त्याच्या सोबत एक पाच वर्षाची मुलगी आहे. तिची माहिती काढली तर कळाले की ती जेकब आणि रेडमीची मुलगी आहे. तिला रेडमी सांभाळत नसल्याने तो घेऊन गेला होता. किंवा राॅकी माहित झाल्यावर ती आपली मुलगी नाही तेव्हा त्याने तिला तेथून घेऊन जाण्यासाठी. या अगोदर चार वर्षा पूर्वी या रेडमीच्या मुलीच राॅकीचा भाऊ विल्सनने कीडनॅप केलं होतं तेव्हा रेडमीला वेड लागलं होतं. ती जवळपास दोन वर्षे वेड्याच्या इस्पितळात होती.

अरे वा खूप छान आणि महत्त्वाची माहिती काढली आहेस सीमा. कीपीटप, गुड. सीमा देसाईंच्या कौतुकाने हुरळून गेली. तेवढ्यात प्रभू म्हणाला, ओ मॅडम खाली या जास्त हवेत उडू नका. मी पण राॅकीची माहिती काढली आहे.

संशयीत नंबर १ - राॅकी

सर हा राॅकी एक नंबरचा जुगारी, चालाख, घाणेरडा, बेवडा अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध. सगळ्या वाईट गोष्टी ठासून याच्यात भरलेल्या आहेत. रेडमी सोडून त्याच्या दोन गर्लफ्रेंड आहेत. ऐमीली आणि नेगी.

नेगी तर रशियन पोरगी त्याच्या पाठोपाठ भारतात आली आहे. दोघींसोबत हा सबंध ठेवून आहे. रेडमीवर याचे थोडेही प्रेम नव्हते. अशा श्रीमंत आणि माॅडेल टाईप पोरी कटवायच्या आणि त्यांच्या पैशावर मजा करायची. अशी याची जीवन शैली. कमवणे बंद झाले की तिला सोडून द्यायच दुसरी करायचं. रेडमी त्याची तिसरी बायको. रेडमीला कसल्यातरी गोष्टीची भीती घालून ब्लॅकमेल करून, तिच्याशी लग्न करून भारतात घेऊन आला. पण मुल होऊन द्यायला तयार नव्हता. याच काळात जेकब रेडमीच्या जीवनात आला. अॅडमीही त्याचीच मुलगी. त्याचा भाऊ विल्सन हा मोठा गुंड व स्मगलर आहे.

राॅकीने रेडमीच्या जीवावर भरपूर पैसा कमावला आहे. आता पाण्यासारखा उडवतोय. पण मागच्या पंधरा दिवसांपूर्वी त्याला अॅडमी ही आपली मुलगी नव्हती हे कळाले होते. तो रेडमीवर खूप रागात होता. तो कित्येक दिवस घरी पण येत नव्हता. मला वाटतंय त्यानेच तिला आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी रागात किडनॅप केले असावे.

अरे वा प्रभू तुला मानलं मी.

सर मी उद्याच त्या जेकबची कुंडली काढून आणते की नाही बघा.

अरे अशे लहान मुलासारखं स्पर्धा काय करताय. एकमेकांशी. देसाई हसले नंतर म्हणाले, सांभाळून करा जे काही करायचे ते. रेडमीच्या जीवाला धोका व्हायला नको.

आज प्रभू जरा गडबडीत हाॅटेलवर आला. सर मला जेकबची सगळी कुंडली कळाली आहे. अरे हो दमान घे बाबा, पाणी पी, असं कुत्रा मागे लागल्या सारखा का पळत पळत आलास. ओ सर खरंच कोपऱ्या वरचा कुत्रा मागे लागला होता माझ्या. कुत्रऱ्याचं व माझं गेल्या जन्मीच भांडण होतं वाटतं. प्रभू चहा घेणार का?

हो सीमा मॅडम तुम्ही बनवणार असाल तर काहीही घेईन. सीमा चहा बनवत असताना प्रभू जेकबची माहिती सांगू लागला. देसाई रेकॉर्ड करत होते.

संशयित नंबर २ - जेकब

जेकब हा रेडमीचा लहानपणीचा मित्र. तो तिच्यावर तेव्हापासूनच प्रेम करायचा. जेकब साधारण घरातील मुलगा होता. तर रेडमी पाच वर्षांपासून वडिलांना ‌भरपूर पैसे कमावून देत होती. पुढे पुढे रेडमी मोठी माॅडेल झाली. रेडमीने घर बदललं. ती मोठ्या घरात रहायला आली. जेकबनेही तिच्या घराजवळच आपलं छोटं घर घेतलं. आता रेडमीही त्याला जास्त भेटता येत नव्हतं. पण तो रेडमीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असे. रेडमीच्या जीवनात जे काही घडलं ते सर्व काही त्याला माहित होते. एवढंच नाही तर रेडमी लग्न करून भारतात आली तेव्हा तो ही तिच्या मागे भारतात आला होता. दोन वर्षे तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. पण मधेच त्याचे वडील वारले आणि तो रशियात परतला. लगेच सहा महिन्यांत रेडमीपण रशियात परतली. तो परत तिच्यावर लक्ष ठेवून राहू लागला. त्याने रेडमीच्या हातून नकळत एकाचा खून होताना पाहिला पण होता. पण रेडमीच्या मते तो माणूस जिवंत असून जेकब ज्या दिवशी तिला तिच्या घरात रात्री भेटला त्याच वेळेस पाच मिनिटे अगोदर तो भेटून गेला होता. त्याच व्यक्तीच्या मृत्यूची भीती घालून तिला ब्लॅकमेल करून राॅकीने तिच्याशी लग्न केले होते. हे सत्य जेकबने तिला सांगितले. त्याच बरोबर प्रेम असलेले सांगितले. रेडमीने त्याला आपला सेक्रेटरी बनवून भारतात आणले. पुढे त्यांना एक मुलगी झाली. तिच्या अपहरणाच्या वेळी रेडमीला वेड लागले. त्यामुळे त्याने त्या मुलगीला आपल्या सोबत नेहले. रेडमी ठीक होऊन आल्यावर तिने एकदाही मुलीची वा त्याची चौकशी न केल्याने तो रागात होता. रेडमीला पळवून नेण्यासाठी तो एक दिवस अगोदर भारतात आला होता.

माय गॉड प्रभू तू तर खरंच खूप महत्त्वाची माहिती शोधून काढला रे. शाबास. सीमा तोंड गोड चहा पितानाही कडवट झाले होते. देसाईंच्या ते लगेच लक्षात आले. ते स्मित हास्य करून मोबाईलमधे पाहू लागले.

मला कुणी तरी पाणी द्याल का? प्लीज हेल्प मी, मला तहान लागली हो, भूक पण लागली आहे. ती त्या अंधाऱ्या खोलीत धडपडत चालू लागली आणि तोल जाऊन खाली पडली. आज पंधरा दिवस झाले अन्न आणि पाणी मिळाले नव्हते. वरून कुठून तरी थोडासा आवाज ऐकू येत होता. वरच्या तावदानातून अंधुकसा प्रकाश. बाकी कुठलंही जग तिला या महिन्यात पहायला मिळाले नव्हते. आपण कोठे आ होतं हे ही माहित नव्हतं. आपण काय गुन्हा केला म्हणून आपल्याला सुख आणि सुखी आयुष्य लाभलं नाही. एवढी सुंदरता आणि पैसा असून काहीच कामाचा नाही. खरंच अति सुंदरता शाप असतो म्हणतात. तसंच काहीसं मा‍झ्या बाबतीत घडलं आहे. ती रडत रडत विचार करत होती. तेवढ्यात तिच्या पायाला ड्रम सारखं काही लागलं. ढप्प असा आवाज झाला. याला वाजवलं तर बाहेर ऐकू जाईल, या विचाराने ती वाजवू लागली. वर राहणारी लिली मर्चंट एकदम तो आवाज ऐकून दचकली. त्याने खरं म्हटलं होतं की या इमारतीच्या तळघरात भूत असतं. त्याला फक्त खायला प्यायला द्यायचं मग ते राहू देत. तिने पटकन काही खायचं सामान आणि पाण्याची बाटली त्या झाकलेल्या होल मधून खाली टाकली. ढपप, ढपप असा दोनदा आवाज आला. खाली तळघरात असलेली ती हाताने चाचपडू लागली. तिला जेवण व पाणी मिळाले. ती हावऱ्यासारखे खाऊ लागली. मधेच पाणी पिले. तिला ढसका लागला. ती ढसकू लागली. तो आवाज इको होऊन वर येत होता. तो वेगळाच. लिली मर्चंट घाबरली. तिला वाटलं इथून पळून जावं. पण लहान मुलांना घेऊन कोठे जाणार होती. जोपर्यंत तळघरातले भूत वर येत नाही तो पर्यंत भीती नाही.

पण तळघरात भूत नव्हतेच मुळी, ती होती रेडमी तिला तेथे कोण ठेवलं होतं हे खुद्द रेडमीलाही माहित नव्हते. पोलिसांना तर अजून तपास लागला नव्हता. ज्याने हिला पळवले होते त्याला या आलेल्या पोलिसांची माहिती मिळाली त्या दिवशी त्याने रेडमीला आपल्या घरातून या जुन्या इमारतींच्या तळघरात नेले होते. पण कोणी नेले होते रेडमीला?

रेडमी कोठे होती हे अजून कोणालाही माहीत नव्हते. एक महिना होतं आलेला‌, पोलीस आणि सीबी आय यांना कुठलाही तपास लागला नव्हता. सगळे संशयीतांचा कसून तपास घेत होते. जेकब आणि राॅकीचा इतिहास उलगडला होता. त्यांच्या बारीक हालचाली वर पोलीस लक्ष ठेवून होते. पण काही सापडत नव्हतं. दरम्यान प्रभूने वेल्सन डिसुझाची माहिती काढून आणली होती.

देसाईंना वरून दबाब पडत होता. वीस दिवस होऊन गेले तरी तपासात प्रगती नव्हती. ते टेन्शनमधे चक्कर मारत होती तर सीमा लॅपटॉपमधे काहीतरी शोधत होती. तेवढ्यात दरवाज्यावर तीनदा टकटक झाली. ती टकटक परवरलीची होती. प्रभूच करत होता. तो आत येऊन सोफ्यावर धपप् करून बसला.

काय सीमा मॅडम काय शोधताय एवढं यात? तो हसला. चिडलेला देसाई त्याच्यावर जोरात ओरडले. प्रभू एक तर या रेडमीची काहीच बातमी मिळत नाही. तू मस्त गप्पा मारत बस्स. अहो सर मी आजच विल्सनची कुंडली शोधून काढली आहे.

संशयित नंबर ३ - विल्सन डिसुझा

सर हा राॅकीचा सावत्र भाऊ‌. पहिल्या आईचा मुलगा. त्याची एक मोठी बहीणपण आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडून राॅकीच्या आईशी लग्न केले त्यामुळे त्याच्या आईने जीव दिला. त्यामुळे विल्सन हा वडील, सावत्र आई व भाऊ राॅकीवर चिडून होता. त्यांच्यामुळे आपली आई गेली असं त्याला वाटायचं. वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांना गाडीसमोर ढकलून मारलं. त्याला रिमांड होममध्ये ठेवलं गेलं. बहीण सतरा वर्षांची तिने एका मुलासोबत लग्न करून गेली.. चार वर्षांनंतर तो बाहेर आला तेव्हा त्याला आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. बहीण दिल्लीला असते असं कोणीतरी सांगितले म्हणून तो तेथे जाऊन शोधला पण ती सापडली नाही. गोव्यात परत आल्यावर काम धंदा काही नव्हता. रिमांड होममध्ये एका मुलासोबत ओळख झालेली तो त्याच्याकडे गेला. तो सध्या स्मग्लिंगच्या धंद्यात काम करत होता. यालाही तेथेच काम लावले. बघता बघता वेल्सन खूप पुढे गेला. पण राॅकीला त्रास देणे आपली संपत्ती मिळवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणे हे करतच होता. पण दरम्यान त्याला कळाले की राॅकीने जुगार व सट्टावर सर्व संपत्ती उधळून लावली आहे. तो काही काळ शांत झाला. इकडे त्याच्या बाॅसच्या मृत्यू नंतर तोच बाॅस झाला. जगातील सगळे वाईट धंदे वेल्सन करू लागला. अनेक पोलिसांना त्याचा तपास आहे. राॅकीने रेडमीच्या आधारे परत खूप पैसे कमवलेले पाहून त्याने अॅडमीला पळवले. राॅकीकडून भरपूर पैसे काढून त्याची‌ मुलगीपण विकणार होता. पण पोलिसांमुळे तो बेत हुकला. ज्या कोळ्यांना ती मुलगी मिळाली होती त्यांची पण खूप चौकशी केली. तेंव्हा फक्त एवढं कळाले की त्यांना त्यांच्या नावेत दहा लाख रुपये आणि ही मुलगी मिळाली होती. तिला घरा जवळ सोडलं आणि पाच पाच लाख वाटून घेऊन शांत बसले.

हं एक काम कर प्रभू त्या दोघा कोळ्यांना परत ताब्यात घे आणि चौकावर आण बघू परत काही सापडत का?

ओके सर म्हणून प्रभू निघून गेला. देसाई खिडकी बाहेर पहात थांबले. सीमा त्यांच्याकडेच पहात होती.

ऐ बाई‌ असं जास्त माझ्याकडे पाहू नको नाहीतर माझी बायको तुझे आणि माझे डोळे हातात काढून देईल.

काय हो सर काहीही काय म्हणता असं म्हणत सीमा खोली बाहेर निघून गेली. देसाई हसत हसत टेबलवरची डायरी वाचू लागले.

देसाई फाईल पहात असताना त्यांना गोव्यातील इन्स्पेक्टर राजेंचा फोन आला. सर आताच बातमी आली आहे की याकुर्ल बीचवर एका परदेशी तरुणीचे शव पडलेले आहे. कोणीतरी तिच्यावर बलात्कार करून निर्घृण खून केला आहे. पूर्णपणे छिन्नविछिन्न झालेले शरीर आहे. नशीब चेहरा व्यवस्थित आहे. आपल्याला ताबडतोब तिकडे येता येईल का?

हो निघालोच. देसाई पायात बूट घालत असताना कांबळेंना आपल्या टीम सोबत निघायला सांगितले. रुम लाॅक करून सीमाच्या रुमचे बटण दाबले. हाफ चड्डी आणि टी-शर्ट मधेच सीमाने दरवाजा उघडला. फोनवर असल्याने तिच्या ते लक्षात आले नाही. पण सीमाला अशा रुपात प्रथमच देसाई पहात होते. अतिशय गोऱ्यापान मांड्या दिसत होत्या. ते पाहत आहेत हे जेव्हा सीमाच्या लक्षात आले तेव्हा तीने फोन कट करून बाथरूममधे निघून गेली. पॅन्ट चढवून बाहेर आली. काही काम होतं का सर, गांगरलेले देसाई म्हणाले चल गाडीत बस सांगतो सगळं. नजर चोरून ते बाहेर निघून गेले. सीमा आपल्या धांदरटपणावर हासत बाहेर आली. गाडीत बसल्या बरोबर प्रभू टपकला आणि देसाईंच्या शेजारी बसून तोही सगळं ऐकू लागला. सुमारे अर्धा तास प्रवास करून सगळे तेथे पोहचले पण ती युवती रेडमी नव्हती. पण त्याही मुलीच्या खूनाचा तपास लवकर करा असं सांगून देसाई तेथील‌ एका बेंचवर बसून गेले. सगळी आवराआवर झाली. त्या मुलीची बाॅडी पोस्ट मार्टमला गेली. बिचवर फक्त प्रभू, सीमा आणि देसाई उरले.

सर येथे आता कोणी नाही. मी रिचर्ड गेलची कुंडली शोधून काढली आहे. सांगू का.

इथे नको हाॅटेलवर चल तेथेच रेकॉर्ड करू. सीमा लिहून घेईल.

ते तिघेही हाॅटेलवर आले.

सांग बाबा आता, ही रेडमी कुठं गेली काय माहित, आपली झोप उडवली हिने.

संशयित नंबर ४ - रिचर्ड गेल

रिचर्ड गेल हा राॅकीचा बालमित्र. त्याच्या सगळ्या वाईट गोष्टीत साथीदार. पैसे उडवणे, तरूण व सुंदर मुलींना फसवणे हा आवडता धंदा.

राॅकीच्या जिवनात रेडमी आली, त्याच बरोबर तिचा पैसाही. रिचर्डला हे दोन्ही हवे होते. राॅकीकडे त्याने तगादा लावला. रेडमीला माझ्याकडे पाठव नाहीतर मी तिला सर्व काही सांगेन. त्याच्या ब्लॅकमेलला कंटाळून त्याने रेडमीला खोटं सांगून त्याच्याकडे पाठवले पण तिने भर पार्टीत रिचर्डच्या कानाखाली वाजवली. तेंव्हा पासून रिचर्ड रेडमीवर दात खाऊन होता. वरून राॅकीनेही त्याला अलगद बाजूला सारले होते. त्यामुळे तो रेडमीचे अपहरण करू शकत होता. पण त्याने पैशासाठी अजून एकही फोन केला नव्हता. त्याच्या सर्व ठिकाणावर छापे टाकले पण रेडमी सापडली नाही. तो ‌आता पणजीच्या जेलमध्ये आहे.

सर एक महिना संपला इथं येऊन हाती काहीच लागत नाही. आपण परत कधी जायचं आहे?.

का? कर की गोव्यात मजा. रात्री करतोस तशी. बायको मुलांची आठवण यायला लागली का? देसाई प्रभुला विचारू लागले. तसं काही नाही सर, बायकोचा फोन आलेला, म्हणाली गोव्यात दुसरं घर केलं की काय येतच नाही परत म्हणून. तिला सांग दोन दिवसात येतो म्हणून. तू दोन दिवस जाऊन ये. सीमा तुलापण जायचे का? नाही सर, माझी कोण वाट पहातय. लग्नच झाले नाही अजून. आईला माहित आहे. मी काय काम करते ते.

बरं राहिलेले दोन संशयित सीमा तू शोधून काढ. मी जरा रेडमीच्या घरी जाऊन येतो.

देसाई जीप घेऊन रेडमीच्या घरी निघून गेले. प्रभू जायच्या तयारीत लागला. सीमा आपले आवरून पुढच्या कामाला लागली. हाॅटेल डीमांझा, पहिला मजला एक पाय लाकडाचा, एक हात कोपरा पासून नसलेला. लंगडत लंगडत तो लिफ्टकडे निघालेला. तेवढ्यात एका मुलीचा त्याला धक्का लागला. ती साॅरी म्हणत उठली आणि त्याच्याकडे पाहून किंचाळलीच. एक डोळा नसलेला खडबडीत चेहरा. असा विद्रुप चेहरा बघून कोणीही घाबरला असता. पण हा कोण होता. हा, सॅमसन पॅम

सीमा त्या हाॅटेलमधे गेली. एक ग्लास व्हिस्कीचा मागवून ती सगळीकडे नजर फिरवू लागली. एका वेटरला अगोदरच पैसे देऊन ठेवले होते. सॅमसन दिसला की तिला खुणावायचा. थोडावेळ गेला आणि त्याने सॅमसनला दाखवले. सीमालाही त्याला पाहून शिरशिरी आली. एवढ्या घाण माणसाचा रेडमीही काय संबंध असेल असा विचार करू लागली. तेवढ्यात तो तिच्या पुढ्यात येऊन थांबला. ती उठणार इतक्यात तो तिला थांबवू लागला. मला माहित आहे, तू माझाच शोध घेत इथे आली आहेस. मी सांगतो मी कोण.

संशयित नंबर ५ - सॅमसन पॅमेल

मी सॅमसन पॅमेल

मी मुळचा रशियन. तुझ्या सारखाच मी पण थोडासा डिडेक्टीव्ह. राॅकी जेव्हा रशियात आला तेव्हा मला रेडमीवर पाळत ठेवण्यासाठी ठेवले होते. कुठेही सुनसान ठिकाणी गाठून तिला घाबरवयाचे आणि राॅकी मला मारून रेडमीच्या नजरेत हिरो होणार होता. पण त्या दिवशी मी तिला रागवायला गेलो तर तिने मला रागात खाली दरीत ढकलून दिलं. सुदैवाने मी वाचलो. मला वाचवण्याचा तिने वा राॅकीने प्रयत्न केला नाही. माझा एक पाय, अर्धा हात, आणि एक डोळा मी कायमचा गमावला. विद्रुप झालो मी. परत आॅपरेशन‌ करून सर्व करणार आहे पण त्यासाठी मला भरपूर पैसे लागणार आहेत. मी रेडमीला रशियात ही भेटायला गेलो होतो. पण त्या वेळी दुसरे कोणी आल्याने मी माघारी फिरलो. म्हणून मग इथंपर्यंत आलो. मोठी रक्कम मी तिच्या कडून काढणार होतो पण मधेच ती गायब झाली. मला वाटतंय की मी त्या दिवशी फोन केल्यानंतर ती मुद्दाम कुठेतरी लपून बसली असेल किंवा पळून गेली असेल. मला पैसे द्यावे लागू नये म्हणून. पण मी राॅकी कडून दहा लाख घेतले आहेत. पण मला रेडमीचा शोध आहे. तुझ्या सोबत मीही शोधत आहे. तुझ्या प्रत्येक हालचालींवर माझं लक्ष आहे. मला रेडमी सापडली तर तुलाही कळवेन. जा इथून ही जागा चांगल्या मुलींनसाठी नाही. सीमा काही न बोलता तेथून उठून आली. परत आल्यावर सर्व माहिती जशीच्या तशी देसाईंना दिली.

सीमा त्याच्या म्हणण्यानुसार रेडमी खरंच पळून गेली असेल तर? राॅकीने याच्याच खूनाच्या आरोपाखाली रेडमीला ब्लॅकमेल केले असेल. त्याशिवाय का एवढी सुंदर माॅडेल अशा फडतूस माणसाशी लग्न करेल.

सर मी, प्रभू, तुम्ही आणि इथले पोलीस गोव्यातील प्रत्येक गाव व घर, हाॅटेल पिंजून पिंजून काढले आहेत पण रेडमीचा शोध लागत नाही सर.

तुम्हाला काय वाटते सर ही अॅनी रेडमीला का अपहरण करेल.

हे सीमा राॅकीने अॅनीसी सबंध ठेवले होते. अॅनीचा नवरा पिदाडा आणि तिच्याच पैशावर मजा करणारा आहे. ती त्याला सोडून गेली होती. रेडमीच्या पैशावर मजा करत मस्त आयुष्यभर तिला येथे राहता आले असते. पण रेडमीच असं होऊ शकलं नसतं. तिला आपली सेवा करायला लावली असती.

काय माहित सर. तिच्या चेहर्‍यावरून तर ती तशी वाटत नाही. बघूयात. नाही सीमा आपल्याला फक्त आठ दिवस दिले आहेत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी. नाहीतर आपण हारलो असं सांगून परत मुंबईला जावं लागेलं.

सर मी अॅनीची माहिती काढली आहे.

संशयित नंबर ६ - अॅनी

रोज फर्नांडिस यांची सहावी मुलगी. मुलगा हवा म्हणून रोज यांच्या नवऱ्याने म्हणजे राॅजर याने सहा मुली केल्या. शेवटी एक मुलगा झाला. रोजची फॅमिली कोळ्याची होती. रोज मासे मिळतील असे नाही. म्हणून रोज हॉटेलमधे काम करू लागली. पुढे मोठ्या दोन मुलीही तिला मदत करू लागल्या. राॅजरचा अति दारू प्यायल्याने मृत्यू झाला. रोजने आपल्या मोठ्या दोन्ही मुलींचे लग्न केले. आता खालच्या दोन मुली तिच्या बरोबर काम करू लागल्या तर पाचवी व सहावी अॅनी घरी राहून घरकाम करू लागल्या. पैसे नसल्याने पाचव्या मुलीचे आठवी तर अॅनीचे सहावीमधे शिक्षण बंद झाले. पुढे सगळ्यांची लग्न झाली. अॅनीचे शिक्षण जास्त नसल्याने तिला नवरा कोळीच मिळाला. दुसर्‍याच्या बोटवर तो काम करू लागला. अॅनीने मग आपले काम शोधले. ती इतरांच्या घरात काम करत करत ती रेडमीच्या घरापर्यंत पोहचली. येथे तिला भरपूर पैसा मिळू लागला होता. राॅकी दार पिऊन अस्ताव्यस्त पडायचा. त्याचे कपडे आवरताना तिला भरपूर पैसे मिळत. रेडमीचेही पैसे ती सांभाळे. पुढे पुढे अॅनीच सर्व कारभार बघू लागली. मधेच राॅकीने तिच्याशी संबध ठेवू लागला. भरपूर पैसे देऊ लागला. अॅनीला अजून मुलबाळ नव्हते. गरीब आणि दारूडा नवरा तिला आता नको होता. इथेच तिने आपला मुक्काम हलवला होता. मधे रेडमी वेड्याच्या इस्पितळात दाखल झाली तेव्हा पूर्ण घर अॅनीच्या ताब्यात होते. पण रेडमी परत आल्याने तिला रेडमीची चाकरी नको वाटत होती. तसेच राॅकी आणि तिच्या आयुष्यात रेडमीचा अडथळा होतं होता. ती रेडमीला येथून दूर करण्याच्या प्रयत्नात होती. पण रेडमी हरवल्या पासून तिच्यावर लक्ष ठेवून आहे. पण तिच्या वागण्यात काही बदल जाणवला नाही. त्यामुळे रेडमीच नक्की कोण अपहरण केलयं कळतंच नाही सर.

ते तर म्हणतोय सीमा आज महिना झाले हाती काहीच येत नाही. मलातर वाटतंय ती रेडमी स्वतः च कोठे तरी गायब झाली आहे.

त्याच वेळेला त्या इमारतीच्या तळघरात अंगावर उंदर चढून चावे घेत असल्याने रेडमी जोरजोरात रडत होती. प्लीज हेल्प मी, मला वाचवा कोणीतरी. पण तिचा आवाज इको होऊन बाहेर वेगळंच काहीतरी ऐकू येत होतं. जेणेकरून वरून ऐकणाऱ्या लिली मर्चंटला वाटत होतं. खरंच तळघरात भूत आहे जे वेगवेगळ्या आवाजात ओरडतंय. पुढचे आठ दिवस देसाई तपास करून. रेडमीचे अपहरण झाले नसून ती स्वतः च कोठेतरी पळून गेली आहे. असा अहवाल देऊन सी आयडीची सर्व मंडळी मुंबईला परत निघून गेली. मग रेडमीचा शोध कोण लावणार? कोणी केलं होतं तिचं कीडनॅप? कोठे होती ती? शेवटी रेडमी सापडेल की नाही? अॅडमीला आई भेटेल की नाही?

आज रेडमीला गायब होऊन सहा महिने होतं आले होते. अॅनी खूप खूश होती. तिच्या मनासारखं घडलं होतं पण आजकाल राॅकी जरा चिडचिड करत होता. करणारचं, कारण त्याची कमावती बायको गायब झाली होती. पैसे यायचे बंद झाले होते. अति उधळेपणामुळे साठवलेले पैसे संपून डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. राॅकी पैसे न देता नेगी आणि ऐमीली कडून पैसे काढत होता. त्यामुळे त्या त्याला सोडून गेल्या होत्या. ऐमीलीतर आपल्या देशात परत निघून गेली होती. अॅनीला राॅकीला सांभाळाव लागत होते. एवढा मोठा हत्ती म्हणजेच रेडमीच घर सांभाळणं एवढं सोप्प काम नव्हतं. पैसे नसल्याने सगळे नोकर नोकरी सोडून गेले होते.

राॅकीने गोव्यातील सगळ्या मित्रांना आणि लोकांना पैसे मागून झाले होते पण सगळ्यांनी हात वर केले होते. देणे कऱ्यांचा ससेमीरा पाठीमागे लागल्याने काही दिवस झाले राॅकी घरी आला नव्हता. एवढ्या मोठ्या घरात अॅनिला घाबरायला होतं होते. नवऱ्याकडे जावे तर रेडमीच्या अपहरणाना नंतर तीन दिवसात तो गायब झाला होता. पण पोलिसांना हे माहित नव्हते.

तळघरात केस पिंजारलेली रेडमी भिंतीवर हात मारून मारून रडत रडत सुटकेसाठी भीक मागत होती.

देवा कोणत्या जन्माच माझं पाप रे जे असे जीवन माझ्या वाट्याला आले. माझ्या देशात, माझ्या शहरात, माझ्या घरी मी सुखी होते तर माझ्या आयुष्याला वळण देऊन या भारतात आणलंस. इथंही मला कधी सुख लागलं नाही. हावरा नवरा मिळाला माझ्या शरीराशिवाय आणि पैशाशिवाय त्याला दुसरं काही दिसलं नाही. जेकब मला वेड लागल्यावर माझी ठीक व्हायची वाट न बघता आपल्या देशात निघून गेला. माझी छकुली अॅडमी काय माहित कुठं आहे. जिवंत तरी आहे की नाही माहीत नाही. रेडमीला अॅडमी जिवंत असून ती जेकबकडे आहे हे राॅकीने सांगितले नव्हते. त्यामुळे ती तिच्या काळजीत रडत होती.

खरंच एवढ्या सुंदर व श्रीमंत माॅडेलवर ही वेळ येईल असं स्वप्नात ही कोणाला वाटलं नव्हतं.

न्यूयॉर्क शिटीतील एका मोबाइल कंपनीत एक तरुणी ताडताड पाऊले टाकत जात होती. तिने पांढरा शर्ट, ग्रे कलरचा स्कर्ट आणि ग्रे कलरचा जॉकेट तिने घातला होता. अतिशय शांत आणि संयमी चेहर्‍यांनी ती चालत होती. तिच्या शेजारी तिचा नवरा जेम्स चालत होता. तो आपल्या मॅनेजरला आजच्या मिटींगच्या सुचना देत होता. ती लवकरच मिटींगरुममध्ये पोहचली. सगळ्यांनी उठून तिचं स्वागत केलं. चेअरमनच्या खुर्चीत तिचे वडील बसलेले होते. ती डिन आणि मालकीन या पदाने बोलत होती. तिचे आजच नवीन मोबाइल लाॅंच झाले होते. रेडमी वन, टू, थ्री पहिलेच आले होते. आज फायु आणि सीक्स लाॅंच झालेले होते. रेडमीच्या नावाने मोबाईल लाॅंच करणारी स्त्री कोण होती? तर ती होती अॅडमी जेकब, वय वर्षे बत्तीस.

म्हणजेच होय तिचं अॅडमी, रेडमीची मुलगी. जिला जेकबने चार वर्षांची असताना आणले होते. रेडमी वेडी झाल्यावर जेकबने अॅडमीला सोबत नेले होते. रेडमीच्या अपहरणानंतर राॅकी अॅडमीच्या नावावरील पैसा उडवेल म्हणून त्याने तिचे पैसे घेऊन अमेरिकेत गेला. कारण राॅकीला कळल्यावर तो रशियात‌ नक्की येईल. झाले तसेच राॅकी गेलाही. पण जेकबचा पत्ता लागला नाही. त्याला वाटले रेडमी त्यांच्या सोबतच गेली. पण नाही. अॅडमीतर आपल्या आईच्या स्मृती पित्यार्थ तिच्या नावाने मोबाइल काढला होता. गेली अठ्ठावीस वर्ष झाली, रेडमीचा पत्ता लागला नव्हता. पोलिसांनी दोन वर्षांनी फाइल बंद केली होती. राॅकीने रेडमीच घर विकून उधारी फेडली होती. उरलेल्या पैशात नशाकरत एका चाळवजा घरात राहत होता. अॅनी परत एका घरात काम करत होती. तिचंही वय आता साठ झालेलं होतं. नवरा व मुल नसल्याने स्वतः च कमावून खावं लागत होतं.

मग रेडमी गेली कुठं होती. ज्या घराच्या तळघरात होती. तेथील लिली मर्चंट मधेच अॅटकने मेली होती. पण तिची मुलं व सुना न चुकता तळघरात खायला व पाणी टाकत होती. या घरात रहायचं असेल तर तळघरातील भुताला खायला प्यायला द्यायचं तरच ते सुखी राहू देत हे सांगून ठेवलं होतं. तसंही इतक्या वर्षांत त्या भुताने कोणाला त्रासही दिला नव्हता. घरातील कोणीही तळघराकडे घाबरून जात नव्हते. आजूबाजूलाही भुताची कथा माहित असल्याने तेही तिकडे फिरकत नसत. शेजार्‍यांना तळघराच्या खिडकी जवळ केस पिंजारलेले भूत हातवारे करताना कधीतरी दिसत असे.

व्हायचं असं की ऊन जास्त पडलं की रेडमीला बाहेरच थोडंस दिसायचं ती खिडकीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करायची. पाय उंचावून थोडंसं बाहेरच दिसायचं. समोरच्या घरातील गॅलरीत कोणी आलेतर दिसायचे. पण समोरच्या व्यक्तीला तळघराची काच जाड असल्याने काही दिसायचं नाही. फक्त धूसर आकृती आणि हातवारे. त्यांनीही भुताची कहाणी ऐकल्याने ते घाबरून आत निघून जातं. त्यामुळे रेडमीच्या मदतीला कोणीच आलं नव्हतं. गेली अठ्ठावीस वर्ष ती त्या तळघरात होती. आज ती खूप आजारी होती. तिच्या आजूबाजूला खूप अन्न व पाणी पडलं होतं पण तिला खाऊ घालायला कोणी नव्हतं. उठून खाण्याची ताकदही तिच्यात नव्हती. पडल्या ठिकाणी ती मृत्युची वाट पहात होती. सुटकातर होणार नाही हे ती जाणून होती. पण तिला अजूनही प्रश्न पडला होता. तिला कीडनॅप करणारा कोण होता? तिला का कीडनॅप केले? तिला इथे सोडून कुठे गेला. तिला जेकब, राॅकी किंवा कोणीही का शोधलं नाही? रेडमीला कोणी कीडनॅप केलं आणि का?

रेडमीला सगळ्यांनी शोधलं होते पण ती कोणालाही सापडली नव्हती. शहराबाहेरील इनमीन सात आठ घरातील एका घरात रेडमीला तळघरात‌ ठेवलं होतं. वरून भुताची कहाणी सांगितली गेली होती. समुद्र किनार्‍यावर भूत असतात हे लोक आधीच मानतात. त्यात तळघरातून इको होऊन येणारा आवाज आजूनच घाबरवत असे त्यामुळे तिकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. पोलिसां पर्यंत ही गोष्ट गेली नाही आणि कोणाला वाटलेही नाही की तिथे रेडमीला ठेवले असेल. पण तेथे रेडमीला ठेवलं कोणी?

झाले असे की अॅनी जेव्हा तिच्या नवऱ्याला सोडून राॅकीकडे निघून आली तेव्हा तो चिडला. आपली बायको या माणसाने कटवली तर मग आपण पण याच्या बायकोला पळवू भरपूर मोठी रक्कम वसूल करू मग देऊ सोडून असा त्याने विचार केला. जेंव्हा रेडमी बाहेर फोनवर बोलत होती तेव्हा तो आत आला. तो नेहमी अॅनीला भेटायला येत असे त्यामुळे रेडमीने त्याच्यावर लक्ष नाही दिले. अॅनी आणि राॅकी बद्दल काही सांगावंयाचे आहे म्हणून तिला बाजूला नेला आणि नाकावर बेशुद्धीचे औषध लावलेला रुमाल दाबून बाहेर ठेवलेल्या आपल्या गाडीत ढकललं. अंधार असल्याने कोणी केलं कळाले नाही. वरून त्याने डोक्यावर टोपी घातली होती. चेहराही ठीक दिसत नव्हता. रेडमीला घरी आणून तो राॅकीला पैशासाठी फोन लावू लागला पण नेहमी अॅनीच फोन उचलू लागली. त्याला काय करावे कळेना. रेडमीच्या घरी काय चालले आहे हे पाहण्यासाठी आला तर मुंबईहून सीआयडीची टीम तिला शोधायला आली आहे हे कळाले. तो घाबरला, घरी परत येऊन रेडमीला परत बेशुद्ध करून गाडीत टाकले. रात्रीचा एक वाजलेला सारं शहर शांत झोपलेल होतं. रेडमीला कोठे ठेवावे हे कळेना. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की मित्राच्या बायकोने एक घर साफ करून घेण्यासाठी चावी दिली होती. त्याला ते आठवले. तो तडक रेडमीला घेऊन त्या घरी गेला. त्यावेळ आजूबाजूचे गाढ झोपलेले होते. त्याने कालच तळघर पाहिले होते. तळघर कसले एक छोटे घरचं होते ते सामान बाजूला करून रेडमीला तेथे टाकलं. तळघराला कुलूप लावून निघून गेला. तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्यावर सामान ठेवले. कारण येथे रहायला येणारे लोक तिकडे जाऊ नये. वर घरात येऊन तळघरात कोठून सामान टाकले जाते त्या खिडकीचा शोध घेतला. तेथून थोडे खायला टाकले. असे त्याने दोन दिवस केले. खायला व प्यायला टाकले. रेडमीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती दुसऱ्याच ठिकाणी दिसली. तिला कोणी कीडनॅप केले हे कळाले नाही. पुढच्या पाच दिवसात त्याच्या मित्राची बायको तेथे मुलासहीत रहायला आली. मित्र मोठ्या जहाजावर कामाला होता. सहा महिन्यात एकदा यायचा. अॅनीच्या नवऱ्याने मित्राच्या बायकोला म्हणजेच लिली मर्चंटला सांगितले की खाली तळघरात भूत आहे. त्याला खायला प्यायला द्यायच. या खिडकीतून खाली टाकायचं. तुम्हाला मग ते त्रास देणार नाही. झालं तसंच रेडमी कोणाला कसं आणि काय त्रास देणार. लिली मर्चंट सणावाराला कपडे, चांगलंचुंगलं खायला टाकायची. शितपेये, दारू, पाणी वैगरे टाकायची. तिच्या मते तसे केले तर भूत शांत राहिलं. एके दिवशी अॅनीचा नवरा दारू पिऊन रात्री घरी येत असताना त्याला एका कारने उडवले. मरताना त्याने रेडमी बद्दल कोणाला काही सांगितले नाही. त्यामुळे रेडमी तेथेच अडकली.

आज रेडमी पासष्ट वर्षाची होती. खूप आजारी आहे. मरणाची वाट पहात. गोव्याच्या पोलीस स्टेशनमध्ये अजूनही रेडमीची केस मिसिंग म्हणून दाखल आहे. अजूनही पोलिसांना तिला शोधण्यात अपयश आले आहे.

आजना उद्या रेडमी तेथेच कुजून मरण पावेल. एक दैनिय अवस्थेत मरण पावलेली माॅडेल म्हणून...

  • लेखिका - सौ हेमा येणेगूरे, पुणे
   रेडमी | रेडमी  कथा | रेडमी माहिती | marathi story of Redmi |Redmi marathi katha

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या