मराठी साहित्य
मराठी साहित्य हे विविध प्रकारात विभागले गेले आहे, प्रामुख्याने कथा, कादंबरी, कविता, ललित लेख, नाटक, लोक साहित्य, बाल साहित्य, विनोद, अग्रलेख, संपादकीय, स्तंभलेख, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे अशा स्वरूपाचे साहित्य वाचकांकडून वाचले व ऐकले जाते. मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "साहित्य संस्कृती मंडळाची" स्थापना दिनांक १९ नोव्हेंबर १९६० रोजी केलेली आहे व मराठी साहित्य वृद्धिंगत होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तसेच विविध संस्थांकडून प्रयत्न केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने मराठी साहित्य संघ, मुंबई, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या संस्था ओळखल्या जातात तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही काही संस्था कार्यरत आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या संस्थांचा समावेश होतो.
मराठी साहित्य आपल्या आवडीनुसार वाचता यावे म्हणून आम्ही काही पृष्ठे निर्माण केलेली आहेत ती खालीलप्रमाणे -
- Read marathi literature
- Vacha marathi online sahitya
☟
0 टिप्पण्या